क्रीडाकुंभ 2026 मध्ये इरा इंटरनॅशनल स्कूलची दैदिप्यमान कामगिरी; खो-खोमध्ये दुहेरी सुवर्ण, व्हॉलीबॉलमध्ये रौप्य


क्रीडाकुंभ 2026 मध्ये इरा इंटरनॅशनल स्कूलची दैदिप्यमान कामगिरी; खो-खोमध्ये दुहेरी सुवर्ण, व्हॉलीबॉलमध्ये रौप्य

बारामती, दि. ३ : इंग्लिश मिडीयम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित इंटर स्कूल स्टेट चॅम्पियनशिप – क्रीडाकुंभ 2026 स्पर्धेत बारामतीच्या इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर शाळेचा गौरव वाढविला आहे.

खो-खो स्पर्धेत शाळेच्या संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत दुहेरी सुवर्णपदक पटकावले. अंडर-14 मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर अंडर-14 मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक पटकावत शाळेला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. याशिवाय अंडर-12 मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.

Advertisemen

व्हॉलीबॉल स्पर्धेतही इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अंडर-17 मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.

विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त, जिद्द आणि सांघिक खेळाच्या बळावर हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक माऊली सर यांचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धांमध्येही अशीच यशस्वी कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

क्रीडाकुंभ 2026 मधील ही उल्लेखनीय कामगिरी इरा इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय ठरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »