माई फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर , मोठ्या प्रमाणात युवक, जेष्ठ नागरिक व मित्रपरिवार सहभागी
बारामती दि. 21/01/2024 रोजी माई फोउंडेशन ट्रस्ट या संस्थे तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदरील रक्तदान शिबिराचे उदघाटन हे श्री. दत्तात्रेय बाजीराव काळे, श्री. दिलीप बाजीराव काळे, श्री.सुरेश बाजीराव काळे व श्री.शहाजी बाजीराव काळे यांचे हस्ते करण्यात आले माई फाउंडेशन ट्रस्ट ही संस्था वर्षभर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असते सदरील संस्थेमार्फत दिनांक 21/01/2024 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले यात मोठ्या प्रमाणात युवक,जेष्ठानगरिक व मित्रपरिवार सहभागी झाले होते या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 206 रक्तदात्यांनी रक्तदान केले संस्थेमार्फत घेतलेल्या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला संस्थेचे अध्यक्ष ऍड. वैभव काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की वर्षभर ट्रस्टमार्फत विविध सामाजिक शैक्षणिक कामाची रूपरेषा आखलेली आहे वर्षभर विविध समाज उपयोगी कामे ट्रस्ट मार्फत केली जाते संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी रक्तदात्यांचे आभार मानले रक्तदान शिबिर हा कार्यक्रम यशस्वीरीत्या घेण्यासाठी 1) चारुदतत काळे 2) ऋषिकेश काळे 3) मुरुगराज काळे 4) सनी काळे 5) एडवोकेट विवेक बेडके 6)एडवोकेट बाबाजान शेख 7)आकाश काळे 8) ऍड.महेश पवार 9) ऍड. रियाज खान 10) युवराज जाधव 11) फिरोज झारेकरी 12) अभिजीत सुपेकर 13) विजेंद्र काळे 14) विश्वजीत काळे 15) विशाल काळे 16) युवराज काळे 17) सुजल काळे 18) अक्षय व्होरा 19) निखिल जाधव 20) सचिन रत्नपारखे 21) अमन पठाण 22) मयूर मुसळे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले या सर्व सहकाऱ्यांमुळे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.





