पहिल्या अंतर कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कडेपठार किंग्ज जेजुरी संघास
बारामती – धीरज जाधव क्रिकेट अकादमी व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनाखाली आयोजित अंतर कॉर्पोरेट क्रिकट स्पर्धेचं (पर्व १) विजेतेपद कडेपठार किंग्ज जेजुरी संघाने पटकावले. कडेपठार किंग ने साहिबा फैब्रिकेटर्स (बारामती) या संघाने दिलेले २० षटकात १३८ धावांचे लक्ष्य आठ गडी राखून विजय मिळवला.
साहिबा फेब्रिकेटर्स (बारामती) ने १३८ धावा केल्या. त्यामध्ये समर्थ निकम नाबाद ४७ व सुरत जाधव ने 36 धावा केल्या. कडेपठार संघाकडून निखिल कदम, प्रणव कोलते यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. कडेपठार संघाकडून महेश म्हस्के याने आक्रमक 94 धावा केल्या त्याला रोहित मायने याने नाबाद 23 धावा करत संघास विजय मिळवून दिला.
या स्पर्धेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्व बारामती ग्रामीण भागातील खेळाडूंचे व सहभागी झालेल्या कंपन्यांचे कौतूक केले. व आगामी काळात ही साधी महराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा होईल व ज्यामध्ये होतकरु खेळाडूंना आपल्या योग्यतेनुसार नोकरीती संधी निर्माण होईल असा विश्वास दिला.
या स्पर्धेत बारामती अँग्रोचे (संजय सस्ते) महावितरण चे (वायदंडे , साळवे), डेअरी वॉरिअर्स चे (जितेंद्र जाधव) कडेपठार किग्स चे (डॉ. रामदान कुटे ,आशिष सोनावणे , जोशी सर) पॅसिफिक अग्रो चे (अमोल पाचर्णे, प्रशांत ताम्हाणे, योगेश भारती) साहिबा फॅब्रिकर्स (करिम अहमद , गणेश डेरे) या संघांनी व संघमालकांनी सहभाग घेतला तर स्पर्धेत रिअल डेअरी (मनोज तुपे) गोविंद मिल्क (अक्षय शिंदे) पेस टर्मिनेटर्स (गुरूप्रसाद आगवणे) बाऊली (श्रीदत्त जाधव) यांनी सहकार्य केले या सर्वांचे पाठबळ मिळाल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली असे स्पर्धेचे संचालक अकादमी प्रमुख धीरज जाधव यांनी दिली.

