दादांनी रुजवलेल्या विश्वासाला सभासदांचा कौल; विजय स्व. अजितदादांच्या कार्याला समर्पित!


दादांनी रुजवलेल्या विश्वासाला सभासदांचा कौल; विजय स्व. अजितदादांच्या कार्याला समर्पित!

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पॅनेलचे सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडून अभिनंदन

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०३१) ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ला भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

स्व. अजितदादांचे ३४ वर्षांचे योगदान ठरले विजयाच्या स्मरणाचे केंद्र

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी योगदान दिले. कारखान्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते, सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि सहकार क्षेत्रात त्यांनी जपलेला वारसा या विजयाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत असल्याची भावना सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यक्त केली.

Advertisemen

दादांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

सभासदांचा विश्वास हीच आमची ताकद!

या निवडणुकीत सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची खरी ताकद असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीला अधिक गती देणे, यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विजयासोबत सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी!

हा विजय केवळ आनंदाचा क्षण नसून, सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे. सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हेच आमचे ध्येय राहील, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील या विजयाच्या निमित्ताने स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार त्यांच्या निवेदनातून व्यक्त झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »