डॉ.आंबेडकर स्टेडियम साखळदंड मुक्त
दणका ..!
बारामती संचारच्या दणक्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती हे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या आदेशाने सर्वसामान्यांच्यासाठी खुले
बारामती : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम गेली 5 वर्षापासून धीरज जाधव क्रिकेट अकॅडमी कडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरित केले आहे. त्या काळात मैदानावर टेनिस क्रिकेट खेळण्यास सर्वसामान्यस मज्जाव होता. या बाबत अनेक विरोधी संघटनानी आंदोलन केली, परंतु काही राजकीय ठेकेदारांच्या हितसंबंधांनमुळे सदर चे क्रीडांगण सर्वसामान्यासाठी खुले नव्हते.या बाबत रिपाई (आठवले) पक्षांने अनेकदा आंदोलन केली परंतु यश येत नव्हते या बाबत दि.28 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री मा. अजित दादा पवार यांनी बारामती शहराध्यक्ष रिपाई आठवले गट अभिजित कांबळे व जिल्हा कार्याध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर मा. अजित दादांनी मुख्याधिकारी साहेबाना स्टेडियम टेनिस क्रीकेट साठी खुले करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे तरुणांनी मा. अजित दादा पवार यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या व उत्साह साजरा केला.
बारामतीतील खेळाचे क्रीडांगण बाबत साप्ताहिक बारामती संचार हे “खेळाचं मैदान हरवलंय” ! या मतळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली त्याचा परिणाम बारामतीच्या क्रीडा विश्वात व क्रीडा प्रेमीमध्ये जबरजस्त झाला असून या बाबत पालकत्वाकडे आपली नाराजी राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाकडे व्यक्त केली होती. याबाबत अभिजित कांबळे व रविंद्र सोनवणे यांनी खेळाडूचे संघटन करुन प्रतिनिधित्वक स्वरूपात अजित दादांची भेट घेऊन बारामतीतील तरुण व बाल गोपाल खेळाडुंच्या अडचणी समजून सांगितल्या व अजितदादानी आपले कर्तव्यदक्ष स्वभावानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम टेनिस बॉल क्रिकट साठी सर्वसामान्यास खुले केले आहे. खेळाडूनी मा. अजित दादा पवार यांचे जाहिर आभार मानले तर अभिजित कांबळे व रविंद्र सोनवणे यांचे जाहीर अभिनंदन व सत्कार केले आहे.

