पत्रकारांची वरात दिल्लीच्या दारात..!
दिल्ली चले हम ..
बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा. सुप्रिया ताई सुळे यांनी पत्रकारांची वरात दिल्लीला नेण्याचे ठरवले आहे. पंचतारंकीत सोय करण्यात आली आहे. पत्रकारांना आमीश दाखवण्यासाठी खुश करण्यासाठी ही अभ्यास सहल आयोजित केलेचे काही पत्रकारांमध्ये बोलले जात आहे. पत्रकारांमध्ये खुप मोठा असंतोष निर्माण झालेचे दिसून येत आहे. ठराविक विचार सर्णीच्या पत्रकारांना या सहलीचा लाभ मिळणार असून येत्या लोकसभा निवडणुका सहल आयोजित केल्याचे पत्रकार आपापसात बोलत आहे.
या अभ्यास सहली मुळे पत्रकारांच्यात दोन गट पडले असून विक्राऊ पत्रकारांना व राजकीय दृष्टी समविचारी पत्रकारांना या वराती मध्ये नाचाय मिळणार आहे, तर अमिष्ट भोजन मान पान व मानाचा पेटाही मिळणार आहे. तर परतीचा आहेर देखील मिळणार आहे त्यामुळे येत्या लोकसभेमध्ये ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणी प्रमाणे मा. सुप्रीयाताई सुळे शरद पवार गट यांच्या प्रचारात पत्रकारांनी आघाडी घेतल्यास आश्चर्य वाटू नये.