युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न; १६१ बाटल्या रक्त संकलित!
बारामती: युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग), मुन्नाभाई बागवान (उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), फुल अँड फायनल ग्रुप बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर सावित्रीमाई फुले सभागृहात उत्साहात पार पडले. या शिबिराला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि १६१ बाटल्या रक्त संकलित झाले.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
बारामती नगरसेविका आरतीताई शेंडगे (महिला अध्यक्ष बारामती शहर), पैगंबरभाई शेख (अध्यक्ष सोशल मीडिया पुणे जिल्हा), जयकुमार काळे (सरचिटणीस पुणे जिल्हा), मनोजभाऊ केंगार (अध्यक्ष सामाजिक विभाग बारामती शहर), शहाजी काका जाधव (उपाध्यक्ष बारामती शहर), इक्बाल शेख (उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्याक विभाग) यांनी रक्तदानचे महत्त्व सांगितले.
सर्व रक्तदात्यांची योग्य प्रकारे नोंदणी, तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना संजीवनी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भविष्यात असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून हे शिबिर यशस्वी झाले.