मुस्लिम समाजाचे लक्षवेधी हलगी-नाद आंदोलन तात्पुरते स्थगित


बारामती – बारामती शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेले लक्षवेधी हलगी-नाद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मुस्लिम समाजातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बारामती नगर परिषद समोर लक्षवेधी आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Advertisemen

आज, 14 ऑगस्ट रोजी सर्व आंदोलनकर्त्यांची मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भुसे यांनी मुस्लिम समाजाच्या समस्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे मुस्लिम समाजाने 15 ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »