कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये जुगाराचा अड्डा राजरोस सुरू? पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा!
कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये जुगाराचा अड्डा राजरोस सुरू? पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा!
बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोऱ्हाळे बुद्रुक येथील कटिंग पूलजवळ, लाटे रोड परिसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात जुगाराचा खेळ सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
साळवे आणि जगताप हे हा अड्डा चालवत असल्याची चर्चा परिसरात आहे. या दोघांचा कथित जुगार अड्ड्याशी नेमका संबंध काय, याची पोलिसांनी चौकशी करून सत्य समोर आणणे गरजेचे आहे.
जुगाराच्या माध्यमातून तरुणांसह अनेकांना आर्थिक नुकसानीच्या गर्तेत ढकलले जात असताना, पोलीस प्रशासनाने केवळ माहितीची वाट न पाहता थेट घटनास्थळी धडक देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुगार अड्डा सुरू असेल तर कारवाईला विलंब का?
कटिंग पूलजवळील लाटे रोड परिसरात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांची नजर आहे का? जर माहिती असूनही कारवाई होत नसेल, तर त्यामागचे कारण काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
पोलिसांनी तातडीने पाहणी, पंचनामा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि या जुगार अड्ड्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आता वडगाव निंबाळकर पोलीस या कथित जुगार अड्ड्यावर कधी धडक कारवाई करणार? याकडे कोऱ्हाळे बुद्रुक परिसराचे लक्ष लागले आहे.


