गुंडांना पाठीशी घालणाऱ्या वाईन शॉपवर पोलिसांचा प्रहार; बारामतीत खळबळ!


बारामती – बारामती शहर पोलिसांनी नितीन वाईन शॉप साठे नगर या दुकानावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 142 (2) प्रमाणे मोठी कारवाई केली आहे. या वाईन शॉपसमोर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे आणि मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या मारामारीत वाईन शॉपमधील कर्मचारी आणि व्यवस्थापक यांचा सहभाग दिसून आला. या घटनेतील मारामारी करणारा व्यक्ती रेकॉर्डवरील गुंड असून, तो यापूर्वी तडीपार झालेला आहे.

Advertisemen


22 फेब्रुवारी 2024 रोजी पोलिसांनी वाईन शॉपचे मालक आणि व्यवस्थापकांना या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, त्यांनी तक्रार देण्यास स्पष्टपणे नकार दिला. गुंडांच्या भीतीमुळे तक्रार देण्यास नकार दिल्याने समाजात चुकीचा संदेश जात होता आणि लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. तसेच, या वाईन शॉपसमोर बेकायदेशीर जमाव जमून दंगल होण्याची शक्यता होती.
यामुळे 23 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 142 (2) नुसार नितीन वाईन शॉप दोन आठवड्यांसाठी सील करण्याचे कठोर आदेश पोलिसांनी दिले आहेत. बारामतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बारामती शहरातील सर्व आस्थापनांच्या मालकांनी कोणत्याही गुन्हेगाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन कायदेशीर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा गुन्हेगारांविरुद्ध बारामती पोलीस कठोर कारवाई करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
ही मोठी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »