पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; आज सर्व शाळांना सुट्टी


पुणे, दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार (दि. ६ जुलै) सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आज बंद राहणार आहेत. हा निर्णय सर्व माध्यमांच्या शाळांना लागू आहे.

Advertisemen

मात्र, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे व पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »