असुरक्षित पोलीस एक वेगळा दृष्टिकोन
मागील अंकी महाराष्ट्रात पोलीस प्रशासना बद्दल जे लिहिले तो एक दृष्टिकोन आहे. पोलिसांची मानसिकता शारीरिक अवस्था त्यांनी घेतलेले प्रशिक्षण व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या वरिष्ठांचा व सहकाऱ्यांचा होणारा संगती परिणाम याचा विचार करून आधुनिक समाज रचनेमध्ये पोलीस प्रशासनाने घ्यावयाची भूमिका याबद्दल विवंचनात्मक हे सद्र आहे.
पोलीस यंत्रणेला बदनाम करणे त्यांचे मनोध्येय खच्ची करणे किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे हा या लेख मालिकेचा उद्देश नाही. आज सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य म्हणजे कोण तर जे कायद्याला मानतात कायद्याबद्दल आदर व्यक्त करतात व कायद्यानुसार वर्तन करणे हे राष्ट्र निर्मितीचे काम आहे असे समजून कुटुंबात समाजात याबद्दल विचार आचार निर्माण करून एक आदर्श राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतु कायद्याला घरची मोलकरीण मानून कायद्याला स्वहितासाठी हवं तसं राबवून स्वछंदी स्वैराचारी वर्तन करणाऱ्या राजकीय सत्ताधारी 2 नंबरचे दलाल गुन्हेगारांना संरक्षण देणारे व सामाजिक घडी विस्कडून टाकून गावोगावी आराजक्ता माझंविणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध ही लेखमाला आहे.
पोलीस हा भारतीय प्रशासनातला सर्वात मुख्य सर्वसामान्यांच्या काम करणारा प्रशासकीय सेवक आहे. भारतीय घटनेने अमर्यादित अधिकार दिलेला हा सर्वात प्रमुख प्रशासकीय घटक आहे. या मुख्य घटकाबद्दल सर्वसामान्यांच्या नेमकं काय मत आहे, हे येथील वैचारिक कार्यक्षम समाज व प्रशासनाला थोडक्यात आधुनिक युगातील न्यायपालिकेतील व पोलीस प्रशासनातील उदाहरणासहित विविध घटना आपल्यासमोर मांडून इष्ट बदलांचे नवनिर्माण भारतासाठी एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा हा छोटासा वैचारिक प्रयत्न
बारामती मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे कर्तव्यावर असलेल्या एक महिला पोलीस कर्मचाऱ्याची मोबाईल चोरीची फिर्याद बारामती शहर पोलीस ठाणे मध्ये दिल्याची बातमी प्रसिद्ध होत आहे. ही बातमी खरी असली तर या घटनेचा परिणाम जनसामान्यांवर काय होणार आहे. याचा विचार करणे आज काळाची गरज आहे आणि ही घटना जर खोटी असेल आणि ही जनसामान्यांच्यात पसरवण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर जनसामान्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.
महाराष्ट्रातील पोलीस कर्मीना पगार कमी आहे, सेवेतील साधनसंपत्तीची कमी आहे की तात्काळ श्रीमंत होण्यासाठी ही जीवघेण्या प्रयत्नांची पराकाष्टा आहे. पोलीस यंत्रणेला बदनाम करणे जनसामान्यांच्यातली पोलीस प्रशासनाची बदनामी करणे व अशा प्रशासनाला बदनाम करणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्यांचे सहकारी होमगार्ड किंवा झिरो पोलीस नावाने वागणारे लोक जर आपल्या वर्तनाने पोलीस प्रशासन बदनाम करत असतील तर वरिष्ठ पोलीस प्रशासन अधिकारी आपण होऊन अशा कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईंना सामोरे जाण्यास आपण भाग पाडणार आहात का?
पोलीस कर्मचारी जर कॉलेजात सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास पोलीस प्रशासनाला 2 नंबर मधून जे आर्थिक सुख मिळत आहे त्या सुखाचा वाटा सर्व समावेशक वाटला जात नाही काय याबद्दल पुढील अंकी
क्रमशः