‘दोन नंबरवाला असला तर टायरमध्ये गेलाच समजा’ तर ‘राजकीय कामासोबत कंत्राटदारी करू नका’-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार


परभणी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी दौऱ्यात कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ‘दोन नंबरवाला असला तर टायरमध्ये गेलाच समजा’, असा थेट इशारा त्यांनी दिला. बेकायदेशीर मार्गाने काम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांना स्वच्छ आणि निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देताना अजित पवार म्हणाले, ‘पक्षाची प्रतिमा जपायची असेल, तर कार्यकर्त्यांनी नैतिकतेचे पालन केले पाहिजे. त्यामुळे, कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका. जे कोणी यामध्ये आढळतील, त्यांना पक्षातून हाकलून दिले जाईल.’

Advertisemen

राजकीय कामासोबत कंत्राटदारी करू नका.

यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय कामावर लक्ष केंद्रित करावे. कंत्राटदारी करायची असेल, तर राजकारणातून बाहेर पडा,’ असेही पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दोन नंबरवाला असला तर टायरमध्ये गेलाच समजा’,

असा कडक इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्याने परभणीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या या थेट इशाऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »