ॲड. अजित बनसोडे यांच्या प्रभावी उलटतपासणीचा ठसा; NDPS खटल्यात दोघांची निर्दोष मुक्तता


ॲड. अजित बनसोडे यांच्या प्रभावी उलटतपासणीचा ठसा; NDPS खटल्यात दोघांची निर्दोष मुक्तता

बारामती : NDPS कायद्यांतर्गत दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या खटल्यात बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ओडिशा राज्यातील एका पुरुषासह एका महिला आरोपीची निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षाचे वकील ॲड. अजित चंद्रकांत बनसोडे यांनी केलेली सखोल उलटतपासणी तसेच मुद्देसूद लेखी व तोंडी युक्तिवाद या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरले.

कोणार्क एक्सप्रेसमधील बॅगेत गांजा आढळल्याचा आरोप

सन २०२४ मध्ये दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २१ ऑगस्ट २०२४ रोजी कोणार्क एक्सप्रेसच्या एस-१ डब्यात आढळलेल्या बॅगेत ८ किलो ५०४ ग्रॅम गांजा असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. सदर बॅग दोन्ही आरोपींची असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अटकेपासून दोन्ही आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.

११ साक्षीदारांची साक्ष; बचाव पक्षाची प्रभावी बाजू

Advertisemen

खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोग पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. कोणताही साक्षीदार फितूर झाला नसतानाही बचाव पक्षाने साक्षीदारांची कसून उलटतपासणी केली. या प्रक्रियेत अभियोग पक्षाच्या पुराव्यांमधील त्रुटी आणि साक्षींमधील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यानंतर ॲड. अजित बनसोडे यांनी लेखी व तोंडी युक्तिवादाद्वारे आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडली.

बचाव पक्षाचे म्हणणे आणि अभिलेखावरील पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने NDPS कायद्याच्या कलम ८(क) सह कलम २०(ब)(ii)(ब) अंतर्गत असलेल्या आरोपांतून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

सुमारे दोन वर्षांच्या कारावासानंतर मोठा दिलासा

या प्रकरणात दोन्ही आरोपींना सुमारे दोन वर्षे कारागृहात राहावे लागले होते. न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालात बचाव पक्षाने केलेली कायदेशीर मांडणी आणि पुराव्यांचे केलेले विश्लेषण महत्त्वाचे ठरले.

या खटल्यात ॲड. अजित बनसोडे यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. सुमित पाटील, ॲड. शाबाज सिद्दकी तसेच ॲड. अजित बनसोडे अँड असोसिएट्समधील ॲड. मनीष गायकवाड, ॲड. रोहित होले, ॲड. ऋषिकेश शिंदे, ॲड. अजय पवार, ॲड. शीलभद्र भोसले, ॲड. आकाश सवाने यांच्यासह रोहित भोज, तुषार थोरात आणि प्रतीक गायकवाड यांचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »