बारामतीतील सार्वजनिक बांधकाम उपविभागास “माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 नुसारचा फलक” आणि “नागरिकांची सनदेचा फलक” लावण्याचा विसर!


बारामती: बारामती येथील तीन हत्ती चौकाचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली विद्रूपीकरण करण्याचे पाप ज्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बारामती कार्यालयाने केले त्याच कार्यालयातील भोंगळ कारभार आता समोर येत आहे! नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा या सार्वजनिक बांधकाम उपविभागातील, बारामती येथील कार्यालयातच नागरिकांच्या “सनदेचा फलक” तसेच “माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 नुसार फलक” लावणे बंधनकारक असताना देखील बारामती येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंता मा. पाटील यांनी आजतागायत सदर दोन्ही फलक न लावता एक प्रकारे शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे. सदर दोन्ही फलकांमुळे नागरिकांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव होऊन मस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास एक प्रकारे मदत होत असते. सदर फलक न लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तत्काळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बारामती कार्यालयात सदर दोन्ही फलक न लावल्यास येणाऱ्या काळात RPI(आठवले) पक्षाकडून नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले) यांच्याकडून सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »