ताकदीने बा.न.प निवडणूक लढवणार – युगेंद्र पवार


बारामती – बारामती नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर ते आज पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीबद्दल वाच्यता केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात उत्साह संचारला असून बारामती प्रभाग रचनेनुसार नगरसेवक उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची चाचपणी करण्याची सूचना वरिष्ठानकडून मिळाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची राजकीय युती आघाडी कोणाशी होणार हे युगेंद्र पवार यांनी गुलदस्तात ठेवले असून निवडणूक रणनीती ही अनिश्चित असून पुढील निर्णय वरिष्ठ नेते घेतील असे म्हंटले समजते.

Advertisemen

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांमध्ये उत्साह आणि संभ्रमित अवस्था असल्याचे अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांन बरोबर बोलल्यानंतर प्रकर्षणाने जाणवले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून अनेक लोकांनी अजित पवार यांच्याकडे प्रवेश घेतला असून शरद पवार गट गारद झाला आहे. पण अनेक जाणकारांच्या मते अजित पवार गटाने नाकारलेल्या उमेदवारांना शरद पवार गट उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. पण पक्ष फक्त बॅनर पोस्टर व रिक्षाचे खर्च करेल असे सूचना वजा दम शरद पवार गटाने कार्यकर्त्यांना दिला असून त्यामुळे शरद पवार गटाला हा उत्साह फक्त निवडणुकीपुरतेच असेल मनुष्यबळ व आर्थिक कमतरतेमुळे शरद पवार गट बारामती नगरपरिषद निवडणुका कसा लढवेल व कोणती रणनीती आखेल हे उद्याच्या जय पराजयातच ठरले जाईल अन्यथा सर्व काही गुलदस्त्यात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »