रविंद्र सोनवणे यांच्या प्रयत्नाला यश, झोपडपट्टी अंतर्गत भागात विजेचे दिवे बसविण्यात आले


बारामती: बारामती शहरामधील आमराईतील झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात यावेत. यासाठी वारंवार बारामती नगरपरिषदेस लेखी निवेदने मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले) यांच्या मार्फत देण्यात आली होती.यासाठी प्रसंगी आंदोलन देखील करण्यात आले.ज्याची दखल घेत दि.1 डिसेंबर 2023 रोजी आमराई मधील प्रबुद्धनगर येथील झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी सुरवातीचा भाग म्हणून एक विद्युत खांब बसविण्यात आला होता. तद्नंतर आज आणखी काही विद्युत खांब शहरातील बस स्टँड समोरील, दादासोनगर येथील झोपडपट्टी परिसरात बसविण्यात आले. त्याबद्दल सर्व प्रथम मा. महेशजी रोकडेसाहेब (मुख्याधिकारी बा.न.प.) मा.सिद्धार्थ मोरे (अधिकारी विद्युत विभाग) तसेच सागर लालबिगे (कर्मचारी) यांचे आभार.बारामती शहर विशेषतः आमराईतील उर्वरित झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्याकरीता नगरपरिषदेकडे पाठपुरावा चालू असल्याचे यावेळी मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी सांगितले.


उपरोक्त ठिकाणी झोपडपटटी परिसरात विद्युत खांब बसविण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करून मा.रविंद्र(पप्पू) सोनवणे यांचे तसेच बारामती नगरपरिषदेतील संबंधित अधिकाऱ्यारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.
यावेळी मा.रत्नप्रभा (ताई) साबळे (प. महाराष्ट्र उपाध्यक्षा म.आघाडी) मा.संजय वाघमारे (तालुका अध्यक्ष) तसेच मा.संतोष पाडळे,मा.मोहन शिंदे,मा.अविनाश कांबळे,मा.शेखर लोंढे,मा.शाहरुख बागवान,मा.साहिल सोनवणे,मा.रोशन खलसे,मा.तुषार काळे,मा.रवि गायकवाड,मा.आर्यन काळे,मा.गणेश सुर्यवंशी,माऊली कांबळे आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक महिला नागरिक देखील उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »