बारामती बँकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा
बारामती : बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्षअखेरीस ३१ मार्च २०२४ अखेर ३५८४ कोटींचा व्यवसाय करीत ६७.४० कोटी रूपये तरतुदीपुर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी दिली.
बँकेच्या आजवरच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा ढोबळ नफा विक्रमी असून, सर्व तरतुदी पुर्ण करीत बँकेने ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे नक्त मुल्य १५४ कोटींवर पोहोचले असून बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करत एनपीएचे (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.
उपाध्यक्ष श्री. किशोर मेहता, अॅड. शिरीष कुलकर्णी चेअरमन व्यवस्थापन मंडळ, संचालक श्री. रोहित घनवट, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. उध्दव गावडे, सौ. नुपूर शहा (वडूजकर), डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, श्री. विजयराव गालिंदे, श्री. नामदेवराव तुपे, श्री. मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, श्री. जयंत किकले, श्री. रणजित धुमाळ, तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, श्री. शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक श्री. रविंद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक श्री. विनोद रावळ, सरव्यवस्थापक श्री. सोमेश्वर पवार व श्री. विजय जाधव तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी यात सक्रिय सहकार्य केल्याचे अध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी नमूद केले.