संवादवारी उपक्रमास उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांची भेट


बारामती, दि.६: राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रमास उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

बारामती नगर परिषद येथे आयोजित प्रदर्शनास भेटीप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

Advertisemen

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित संवादवारी उपक्रम स्तुत्य असून  राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियान समाजातील तळागाळापर्यंत प्रसार करण्यास मदत होते. या उपक्रमास वारीत सहभागी अधिकाधिक  नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन श्री. पाटील आणि श्री. नावडकर यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »