उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीमध्ये रोजंदारी वरील सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन
Advertisemen
बारामती – येथे बारामती नगर परिषदेसमोर रोजंदारी वरील सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. दि. ०७/१०/२०२४ रोजी पासुन बारामती नगरपरिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. बारामती नगररिषदेमध्ये सन १९९३ पुर्वी च्या रोजंदारीवरील शासकीय नियमानुसार नियमित झालेल्या सफाई कामगार यांना दि. २४/०२/२०२३ रोजी शासन निर्णय ३ मधील तरतुदी नुसार सफाई कामगार यांच्या वारसांना पुन्हा लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु प्रशासन जाणीवपुर्वक रोजंदारी वरील सफाई कामगार यांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.