संपादकीय | दोन दादा आणि एक ताईची काळजी!
संपादकीय |
सद्या रोहित दादा, युगेंद्र दादा आणि सुप्रियाताई यांना राज्याच्या गृह खात्याचे बरेच प्रश्न पडू लागलेत. महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आभास निर्माण होऊ लागला आहे आणि भूतकाळातील भुते मानकटावर बसून थयथयाट करू लागली आहेत. या राज्यातील गोवारी हत्याकांड, खैरांजली हत्याकांड, मावळ हत्याकांड अशी भयानक हत्याकांड घडल्यानंतर ही तत्कालीन गृहमंत्री कैलासवासी आबा अर्बन नक्षलवादाचा गोंडस मुलायमा देऊन आंदोलनाला चिरडून नाहक बळी घेणाऱ्या आपल्या तत्कालीन सरकार मधील मुख्यमंत्री संत्री यांच्या बद्दल भ्र शब्द काढला नाही का महाराष्ट्राचा पाकिस्तान होईल असेही म्हंटले नाही. आता पुतणाराक्षणीचा प्रेम वतु चालला आहे. भूतकाळातील कुकर्म आज फळ रूपाने महाराष्ट्रात चाकू लागल्यानंतर आता महाराष्ट्राचा बिहार झाल्याची बतावणी केली जात आहे. या राज्यात सर्वात जास्त आर्थिक गुन्हेगारी साहेबांच्या काळात तर शासकीय भूखंडाच्या लूटमारीची नवीन प्रथा साहेबांच्या काळातच. आता एकट्या पुण्यामध्ये 100 च्या वर बलात्कार व सामूहिक बलात्कार झालेले आहेत. याबाबत लोकसभेत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले जात नाही. एक अलिखित प्रशासकीय नियम आहे. आमदार व खासदार यांच्या शिफारस शिवाय सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी संगणमताने प्रशासकीय बदल्या करायच्या असतात. जिल्ह्याचे अधिकारी तालुक्याचे अधिकारी जे तुमच्या सहमतीनेच त्या जिल्ह्यात या जिल्ह्यात शासकीय सेवा देत आहेत. आणि पुन्हा हा जिल्हा होतोय की काय पवार कुटुंबियांना भीती वाटते. किती साखर कारखाने बंद पाडले हजारो सभासदांची कुटुंबे देशोधडीला लावले. बंद पडलेले कारखाने कवडीमोल घेऊन आपली घरं भरली अशा पापी प्रवृत्तीच्या लोकांना आता शांतता सुव्यवस्था गुन्हेगारी व गुन्हेगारी प्रवृत्तीची भीती वाटत आहे. ज्या काही दादा, साहेब, ताई, वहिनी यांनी विकासाच्या नावावर कारखाने लाटली, शासकीय जमिनी लाटल्या, लवासाच्या नावाखाली आदिवासी शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आशे आर्थिक गुन्हेगार समाजाचे आर्थिक शोषण करून त्यांच्या पिढ्या बरबाद करणार. आता त्यांना बलात्कारी, खुनी, दरोडेखोर यांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? कालच रोहित दादा यांच्या विरोधात जमीन खरेदी करून घेतल्यानंतरही 50 लाखाची टोपी टाकल्याबद्दल संबंधित कुटुंबाचे आमरण उपोषण चालू आहे. सदरची चित्रफित समाज माध्यमांमध्ये मोठ्याने रडत आहे. सहकारी संस्था खारीज करून त्या संस्था वैयक्तिक मालमत्ता बनवण्याची कुशल कला यांच्याकडूनच शिकावी. हजारो कुटुंबांवर मानसिक बलात्कार करून त्यांच्यावर गृह खात्याची, पोलीस खात्याची दहशत माजवून समाजाला मतदाराला वेठीस धरणाऱ्या दोन दादा आणि एक ताई यांनी स्व विकासामध्ये किती जणांचे मानसिक नाम हरण केले आहे. राजकीय व सामाजिक गुंडांना हाताशी धरून किती जणांना यातना दिल्या. किती कुटुंबावर दरोडे घालून त्यांची संपत्ती लाटली या आर्थिक गुन्ह्यांची माहिती एकदा या राज्यातील मतदारांना तुमच्या कुटुंबातील सातबारे, मालमत्ता क्रमांक, उद्योगधंदे, एजन्सी, केंद्रा व राज्य शासनाची अनुदाने याबद्दल एकदा मतदारांना आपण होऊन सांगा व तदनंतर या राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघातील पोलिसी आकडेवारी मांडा तेव्हा या देशातील व राज्यातील आर्थिक गुन्ह्यांची क्रमांक एकचा जिल्हा लोकसभा व विधानसभा कोणाचे लागेल हे लोकांना मतदारांना कळेल व लक्क सूर्यप्रकाश पडल्यानंतर डोळे दुखतील आणि डोळ्याला अंधाऱ्या येतील आणि हे अंधारमय राज्य दिव्याची वाट पाहेल.