दलित पँथरच्या पुणे जिल्हा सचिवपदी अब्बास भाई शेख यांची नियुक्ती
दलित पँथरच्या पुणे जिल्हा सचिवपदी अब्बास भाई शेख यांची नियुक्ती
पुणे, दि. १४ जुलै : दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या नेतृत्वाखाली अब्बास भाई शेख यांची दलित पँथर, पुणे जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अब्बास भाई शेख यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आंबेडकरी विचार, सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाची चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वातून मोलाचे योगदान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्यासह पुण्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी अब्बास भाई शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत दलित पँथरची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी त्यांच्या कार्यास यश लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

