बारामती पोलीस ग्रामीणचा कायदेशीर कार-भार
बारामती – बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी महसूल कर्मचारी मंडळ अधिकारी आशपाक हनिफ इनामदार व गाव कामगार तलाठी अनिता विनोद धापटे यांनी कटफळ मधून जप्त केलेला पोकलेन चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज दाखल केला आहे. कटफळ येथील गौणखनिज माफीयांनी शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करून गौण खनिजाची चोरी केली आहे. या चोरीमध्ये वापरलेले हत्यारे व यंत्रसामग्री चोरीला गेले असून या तात्काळ ताब्यात घेण्यासंबंधी तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलिसांना सदर यंत्रसामग्री ताब्यात घेऊन रीतसर कारवाई करण्याबाबत लेखी दिले आहे. परंतु सदरच्या तक्रारी अर्जावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही तर सावळ येथील 180 ब्रास मुरूम चोरणाऱ्या व्यक्तीला आजपर्यंत महसूल विभागाने साधे समन्स ही काढलेले नाही किंवा त्याच्यावर चोरीची किंवा दंडाची कारवाई देखील केलेले नाही. यावरून बारामतीतील प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन असो आरोपींना गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. या छोट्या मोठ्या गुन्ह्यातून सही सलामत सुटणाऱ्या गुन्हेगारांचे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून अशा प्रवृत्तीची लोक दरोडे, बलात्कार, खून व जबरी गुन्ह्यांना येथील तरुणांना प्रवृत्त करत आहेत. आणि पुन्हा बारामतीला प्रश्न पडत आहे की बारामती मध्ये गुन्हेगारी का वाढतेय? गुन्हेगारीची पानमूळ या अकार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांच्या खाऊगल्ली मुळे बारामतील ‘गुन्हेगारी बारामती’ कुप्रसिद्ध होत आहे.