संपादकीय | पाच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्यात बलात्कार कांड!


संपादकीय |  बारामती तालुक्यातील व शहरातील महिला व बाल अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथल्या गावगुंडांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे महिला असुरक्षिततेची भावना वाढली आहे. बारामती तालुक्याचे अवभाग्य की बारामती तालुक्याला तीन खासदार आणि दोन आमदार लाभलेले आहेत अखंड भारत भू वर असा चमत्कार भारत भू वर कुठेही नाही पण तो बारामती मध्ये घडलेला आहे इथे जणू बलात्काराची, सामूहिक बलात्काराची, महिला अत्याचाराची स्पर्धा लागलेली आहे या स्पर्धेत जिंकण्यासाठी स्थानिक गावगुंड पुढारी आपली सर्वानीशी ताकद पणाला लावून पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन अखंड दबावाखाली आणण्याचं सामर्थ्य या गल्लीतल्या गुंडांच्या बापाचा आहे. बलात्कार करणे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करणे ही नित्याची बाब आहे. बारामतीतील तीन खासदार दोन आमदार यांची पिल्लावळ बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये नुसता धुमाकूळ घातला आहे. परप्रांतीय कर्मचारी, उद्योजक, व्यापारी, फेरीवाले, टपरीवाले, भंगारवाले यांना दमदाटी करून अडवणूक करून दिवसाढवळ्या हप्ता वसुली चालू आहे. बेकायदेशीर रिवाल्वर गावठी कट्टे हे सापडण्याचे वर वापरण्याचे नित्याची बाब झाली आहे. अल्पवयीन मुलांना हाताशी धरून त्यांना व्यसनाधीन करून उद्योजकांवर टपरीवाल्यांवर कामगारांवर हल्ले करून खंडणी वसूल करणारी राजकीय प्रवृत्ती औद्योगिक वसाहतीमध्ये व परिसराच्या गावांमध्ये वाढलेले आहे. या हुल्लडबाजी अलड अल्पवयीन मुलांना योग्य दिशा देण्यापेक्षा त्यांच्याकडून गुन्हे घडवून त्यांना हत्यारे पुरवून बारामती मध्ये दहशतीचे वातावरण पसरविण्याचे काम चालू आहे यातून आतापर्यंत दोन मुद्दे पडले असून कित्येक गावठी कट्टे सापडले आहेत. तर गंभीर गुन्ह्यामध्ये जीव मारण्याचा प्रयत्न गंभीर इजा करणे दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाईला अतिशय संत गतीने पाऊल वाट चालवण्यासाठी कोण प्रवृत्त करत आहे. यंत्रणेवर दबाव टाकून बारामतीचे भविष्य गुन्हेगारी गंजडी गर्दुल्ले बनवत आहेत. बारामतीचा भौतिक विकास होत असल्याचा अभास निर्माण करून गरीब मध्यमवर्गीय हातावर पोट असणारी कुटुंब निस्तानाबूत करण्याचे षडयंत्र प्रशासनाला हाताशी धरून राजकीय दलाल करत आहेत. तर जमीन खरेदी विक्री बेकायदेशीर बांधकामे बांधकाम व्यवसायिक यांना गुंड पुरवून या तरुण पोरांचं अल्पवयीन पोरांचं भविष्य बरबाद केले जात आहे. यावर तीन खासदार व दोन आमदार आपल्या सुसंस्कृत सभ्य व विकासात्मक दृष्टिकोन या बिघडल्या जाणाऱ्या पुढच्या पिढीला काही आदर्श घालून देणार आहेत की नाहीत की चार आदर्श व्यक्तिमत्व घडवून समाजामध्ये नवा आदर्श निर्माण करणार आहेत की नाहीत. दुर्दैवाने राजकारण्यांचे आदर्श घेऊ नयेत असे आमच्या बापजाद्यांनी आम्हाला सांगितले आहे. शिव शाहू फुले आंबेडकर यांचे आदर्श सांगता त्यांच्या आशीर्वादावर जीवन चरित्रातून तुम्ही (तीन खासदार व दोन आमदार) यांनी बारामती तालुक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव आम्हास सांगावे म्हणजे त्यांचा एक भव्य असा सत्कार समारंभ घेऊन आपल्यासमोर दंडवत घालून आपले जाहीर आभार मागता येतील. अन्यथा निसर्गाचा नियम आहे जे पेराल ते उगवेल पेताड गंजडी गर्दुल्ले गुन्हेगार बलात्कारी आपल्या आसपास फिरताना दिसतील आणि त्यांना संभाळता संभाळता नाकी नऊ येईल मग अशा पेताड खाताड गंजडी गर्दुल्ले गुन्हेगार बलात्कारी दरोडेखोर सांभाळताना त्यांच्या नातेवाईकांना आई-वडिलांना बहिण भाऊ पत्नी यांना काय त्रास होत असेल याची जाणीव तुम्हाला नक्की होईल. प्याताड खाताड गंजडी गर्दुल्ले गुन्हेगार बलात्कारी दरोडेखोर यांना नीतीशून्य अनैतिक मार्गाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेऊन आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांना व आर्थिक शोषण करून स्वतःची घर भरून इमले बांधणाऱ्यांना गाड्या घेणाऱ्यांना व खाकी घालून खादी घालून गोरगरीब मध्यमवर्गीय दुबळ्या कुटुंबातील तरुण नाबालिक युवकांना निस्तानाबूत करून त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ उध्वस्त करून अशा कुटुंबांना देशोधडीला लावून या बारामतीचे समशान बनवू पाहणाऱ्या ना लवकरच काळ्या शिपटी ची किडं पडून तडपताना त्यांच्या शरीरातून जखमा होऊन वाहताना गल्ल्याच्या गल्ल्या दुर्गंधीने भरतील व त्यांना पर गल्लीतील पर गावातील पर तालुक्यातील पर जिल्ह्यातील पर राज्यातील लोक एकत्र येऊन गल्ली ते दिल्ली बंद करतील व सडलेल्या शरीर मन व बुद्धीला त्यांच्या घरातच घरातच नव्हे तर त्यांच्या खोलीतच खोलीतच नव्हे त्यांच्या मोहरीतच बंद करून खोट्या प्रतिष्ठेची अब्रूची लकतडे वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून शेवटच्या घटना मोजाव्या लागतील तर भविष्यात सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक कलंक म्हणून यांची ओळख कुप्रसिद्ध पावेल सावधान.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »