शासनाच्या ताब्यातील पोकलेन चोरीला?


बारामती– बारामती तालुक्यातील मौजे कटफळ, मौजे सावळ, मौजे रुई मौजे जैनकवाडी येथील मुरूम उत्खननात हजारो ब्रास मुरूम वन विभागातून बेकायदेशीर रस्त्याने उपसा केलेला आहे. पोकलेनवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात बारामती विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये दोन पोकलेन एक ट्रक ताब्यात घेऊन जप्त केले होते ही कारवाई मौजे कटफळ, रुई, सावळ, जैनकवाडी च्या मंडल अधिकाऱ्यांनी व तलाठी यांनी केली होती. याबाबत कुठलीही फिर्याद बारामती तालुका पोलीस स्टेशनला खबर दिलेली नाही मुरूम उत्खनन करणाऱ्या व पोकलेन लांबपास करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या विरुद्ध महसूल विभागाने फौजदारी कारवाई करण्याबाबत अपेक्षित असतानाही आर्थिक गैरव्यवहारातून आरोपींना संरक्षण दिले जात आहे अशी चर्चा रुई व कटफळ गावातील ग्रामस्थ करत आहेत. हजारो ब्रास मुरूम चोरीला गेला असताना बेकायदेशीर उत्खनन झाले असताना चोरांवर कारवाई होत नाही याबाबत माननीय तहसीलदार यांना विचारले असता पोकलेन चोरीला गेलेले चे संबंधित अहवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केला नसल्याचे सांगितले आहे. याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अभिप्राय देण्यास असमर्थता दर्शवली तर या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे समजत असून एवढ्या मोठ्या चोरीला व चोरांना पाठिंबा व संरक्षण देत असल्याबद्दल शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांना अभय देणाऱ्या लोकांना प्रशासना विरोधात वरिष्ठांकडे जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे कटफळ व रुई ग्रामस्थांनी सांगितले.

Advertisemen

रात्रीस खेळ चाले

बारामती ग्रामीण भागात मधील शितावरची भूतं गौण खनिजावरची दरोडेखोरांनी रात्रीचा खेळ चालू केला आहे आणि शीतावरची भूतं त्यांना प्रसन्न होत आहेत. बारामती तालुक्यातील गौणखनिज मुरुमावरील जबरी कारवाईनंतर काही काळ थंड पडलेले गौण खनिज उत्खनन व वाहतूक पुन्हा शीताच्या मागणीने व भुताच्या परवानगीने रात्री खेळ चालू आहे. रात्री बारा ते पहाटे पाच या भूतांचा आणि दरोडेखोरांचा उत्खननाचा कारभार चालू आहे त्यामुळे दरोडेखोराला भूत काय लागत नाही भुताचा नवस फेडल्याशिवाय दरोडेखोरांना पर्याय नाही वेताळच्या साक्षीने आणि वेताळच्या आशीर्वादाने बारामती मध्ये गौण खनिज उत्खननावरील दरोडेखोर आणि भुतांचा मेळ बसला आहे. त्यामध्ये या रात्रीतील सर्व साक्ष अंधारातून चोरीचा मामला हळूहळू बोंबला आपण सगळे भाऊ भाऊ शासनाची लूट मिळून खाऊ..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »