महाराष्ट्रातील धार्मिक सहिष्णुता संपुष्टात?
मुंबई – काल मुंबईमध्ये समस्त मुस्लिम समाजाचे मुख्यमंत्री भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन त्यांच्याकडून संविधानाचे पावित्र्य व त्यांची अंमलबजावणी याबाबत चार शब्द ऐकण्यासाठी लाखो मुस्लिम धर्मीय जमा झाले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान मध्ये स्वतःच्या धर्मचारणाबद्दल पूजापाठ संस्कार पद्धतीबद्दल जे नियम व मार्गदर्शक सूचना घालून दिलेले आहेत व दुसऱ्यांच्या धर्माबद्दल त्यांच्या आचरणाबद्दल पूजा अर्चना संस्काराच्या बद्दल मार्गदर्शक सूचना व नियम दिले आहेत त्याचा विसर समाजाला पडू लागला आहे त्याचे स्मरण करून त्याच्या आचरणाबद्दल लोक जागृती करण्याची अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांकडून होती परंतु दुर्दैव आमचं त्यांचं दर्शन होऊ शकले नाही. त्यांची मधुर वाणी कानावर पडली नाही असो या देशातील स्वकीय व परकीय आतंकी आक्रमणकारी म्हणून या देशावर राज्य केले. हा या इतिहासाची मेलेली मढी उकरून दुर्गंधीने किडे पडलेले खड्डया भोवती फिरून त्या दुर्गंधीचा इतिहास पुन्हा पुन्हा लोकांमध्ये सांगून लोकांच्या भावना दुःखवयाचे काम काही साधुसंत व काही जंत करत आहेत. या इतिहासातील मढ्यांचे इतिहासामध्ये परकीय आक्रांतांना भारतीय स्वकीयांनीच जी मदत केली व परकीय आक्रांतांना या देशांमध्ये वर्षोवर्षी अशी हजारो वर्ष त्यांना या देशामध्ये राज्य करण्याची संधी दिली व इथंली लूट करून नेण्यासाठी आपल्या खांद्याची चंबडी लोळवली ओझे वाहून ज्यांचे पाय वाकडे झाले. असे लोक आज या देशातली धार्मिक सहिष्णुता संपुष्टात आणू पाहत आहेत.
या देशावर जेव्हा आक्रमण झाले तेव्हा तेव्हा हे अतिरेकी अगदी आर्यांपासून ते कालच्या इंग्रजांपर्यंत येताना हजार पाचशे दोन हजार तीन हजार पाच हजार सैन्यांच्या फौजा घेऊन या देशावर आक्रमण केलं असेल इथल्या पराजित लोकांना गुलाम केले. इथले चालू देश फरामोश गद्दारांनी या आक्रमणकर्त्यांची गुलामी स्वीकारली व चाकरी केली. इथल्या व्यवस्थेने ज्या माणसांचे माणूसपण हिरावून घेतले ते ज्यांना जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले होते असे लोक ज्यांनी धर्मांतर केले ते ज्यू, पारसी, आर्य, सीख, ख्रिश्चन, मुसलमान झाली हे आम्ही म्हणत नाही तर या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये शूद्र पूर्वी कोण व कसे झाले या पुस्तकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धांत मांडलेला आहे की इथला अल्पसंख्याक हा इथला मूळनिवासी आहे. इथले आदिवासी अस्पृश्य शूद्र हे धर्मांतरीत आहेत. या देशावर ज्या परकियांनी राज्य केले मग ते पोर्तुगील असतील इंग्रज असतील मुसलमान असतील हा देश सोडून जाताना इथली प्रजा ते बरोबर घेऊन गेले नाहीत. या देशाची खाद्य संस्कृती ही बहू आयाम आहे. या देशांमध्ये फार पूर्वीपासूनच मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन खाद्य संस्कृती गुण्यागोविंदाने नांदली आहेत. या देशाचा पेहरावा पद्धती यांच्या भिन्नतेबद्दल काय बोलावं इथल्या भाषेबद्दल काय सांगावं दर बारा मैलावर इथली भाषा आणि कपडे बदलत असतील हा देश कधीही अगदी रामराज्यापासून आत्तापर्यंत एक धर्मीय नव्हता, एक जातीय नव्हता, एक वर्णीय नव्हता मग आजच कुणाच्या डोक्या मधला किडा वळवळला आणि एक धर्मीय देशाची असंविधानिक मागणी पुढे येऊ लागली आणि त्याच्या प्रचार व प्रसारासाठी पर धर्मियांवर शाब्दिक व हिंसक हल्ले होऊ लागले. गुण्या गोविंदाने एकमेकांशी सौख्याने नांदणारे आज एकमेकांशी वैरत्वाची भूमिका घेऊ लागले. सम्राट अशोक हा जागतिक सम्राट ज्यांनी या देशाचे नाव जम्बुदीप असे ठेवले. त्या जगजेत्या सम्राट अशोकाच्या काळापासून ते आजपर्यंत या देशाचे जे तुकडे तुकडे झालेले आहेत हे तुकडे पुन्हा जोडून या देशाला जम्बुदीप बनवायचं आहे. अगदी अशोकाच्या काळात ज्या सम्राट अशोकाने या जगातलं सर्वात मोठं साम्राज्य निर्माण केले त्याच्या साम्राज्यामध्ये ही बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुवर्णीय लोक गुण्यागोविंदाने नांदायचे तर मग “तुम किस खेत की मुली हो” मग या देशांमध्ये जे शेकडो वर्ष हजारो वर्ष घडलं नाही इथल्या मातीला जे मान्य नाही ते एक देश एक धर्म ही वल्गना करणं मूर्खपणा नाही का? स्वतःच्या लंगोट्या संभाळण्यासाठी दुसऱ्यांना नग्न करणं म्हणजे आपल्या लाजेची जागा दुसऱ्यांपासून लपवून ठेवण्यासारखं नाही का? हिरवा आतंक, भगवा आतंक, पिवळा आतंक, निळा आतंक हा या देशांमध्ये पुन्हा खलिस्तान, बॉडोलँड, दलितस्थान अशा मागण्यांना पुढे करून या देशामध्ये अस्थिरता निर्माण करून विश्वगुरूची स्वप्न पाहता येणार नाहीत. इथला माणूस समृद्ध झाला अगदी इथल्या शेवटच्या माणसालाही मूळ प्रवाहात आपण आणू शकलो तरच या विश्वाच्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेण्यास साठी पात्र ठरू आपली लायकी धार्मिकतेवर नसून आपल्या विकसित विचारधारेवर आहे. इतिहासातील मनोरंजक कथांचा स्वप्नरंजक करायचं की आजच्या वैज्ञानिक जगायचं की अंधभक्त होऊन पुन्हा अंधारात जायचं हे विश्वगुरूंच्या स्वप्न स्वप्न पाहणाऱ्यांनी ठरवायचं आहे..


