गोमाता व गोवंश स्वरक्षणासाठी शेतकऱ्यांना वेठीस ; सरकारचा अजब कारभार 3 जून ते 8 जून जनावरांचा बाजार बंद
मुंबई– महाराष्ट्रात 7 तारखेला मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण साजरा होत असून यानिमित्त महाराष्ट्रात दिनांक 3 जून ते 8 जून 2025 रोजी जनावरांचे संपूर्ण बाजार बंद करण्याचे आदेश सरकारने काढलेले आहे. याबद्दल मुस्लिम धर्मीयांनी स्वागत केले असून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मात्र या आदेशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. बाजार बंद करण्यापेक्षा गोमाता खरेदी विक्री बंद केले असते तर बरे झाले असते. परंतु पूर्ण जनावरांचे बाजार बंद करणे हे बुद्धी ची दिवाळीखोरी स्पष्ट केल्याचे दिसत आहे.
या राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना व गोवंश रक्षक कायदा असताना हे नवीन आदेश काढण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडलेला आहे. गोवंश व गोमाता रक्षणाची जबाबदारी सरकारने निश्चित केलेली असताना अशा पद्धतीचे वेगळे परिपत्रक काढून गोमाता व गोवंश रक्षण होणार आहे का? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण झालेला आहे बकरी ईदला गोमातेची किंवा गोवंशाची कुर्बानी देण्याची कुठलीही प्रथा नसताना असे आदेश काढून सरकारला काय सिद्ध करायचे आहे? उद्या या राज्यांमध्ये हिंदूंचे विविध उत्सव जत्रा असताना कोंबडी, बकरे, यांच्या बळी देण्याची पारंपारिक प्रथा असते. अशा वेळेस सरकार कोणती भूमिका घेणार याबद्दल जनसामान्य प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारच्या बौद्धिक दिवाळखोरीच्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत असून हा विषय जनसामान्यांमध्ये चेष्टेचा झालेला आहे.
महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असून आता सुगीचे दिवस आहेत. आता जनावरे खरेदी-विक्रीचा हंगाम चालू झाला असून ऐन हंगामाच्या काळात जनावराचे बाजार बंद करणे कोणाच्या हितामध्ये आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे? तरी या परिपत्रकाचा फेरविचार करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत.


