रामगिरी महाराज यांच्यावर राजकीय पुढार्यांची अटकेची मागणी
संपादकीय | मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द काढणाऱ्या रामगिरी महाराज याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी महाराष्ट्रातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री पदाधिकारी यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक स्वातंत्र्य सैनिक, सैन्यदलातील अधिकारी या देशातील माजी राष्ट्रपती यांचा रामगिरी महाराजांनी अपमान केला असून त्यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी आग्रह धरला आहे. या देशांमध्ये भारताच्या फाळणीनंतर भारताच्या राष्ट्रीय हितासाठी व ज्वलंत राष्ट्रवाद असणाऱ्या खरे राष्ट्रवादी मुसलमान भारतामध्ये राहिले आणि या भूमीशी एकरूप झाले. या देशातील उन्नती, विकास, संरक्षण यामध्ये या मुसलमानांनी इतर धर्मियांच्या तुलनेत कधी आपला सहभाग कमी केलेला नाही. या देशातील उद्योग, शिक्षण, संरक्षण, व्यापार यामध्ये आपला ताकतीनिशी हातभार लावलेला.
फुटीर व आतंकी समाज म्हणून या समाजात बदनाम करणारे षडयंत्र या देशांमध्ये चालू असून याला बळी पडून इथले तरुण धर्म द्वेषाने पछाडलेले आहेत. मुसलमानांचा त्याग या देशाच्या इतिहासाच्या पानापानावर लिहिलेला आहे. स्वातंत्र्य उत्तर या देशांमध्ये ज्या अतिरेकी कारवाया झाल्या व ज्यांनी केल्या व त्या कोणत्याही धर्माच्या असो याचा निषेध मुस्लिम समाजाने नेहमीच केला आहे. या देशांमध्ये खलिस्तान, नागालँड, बोडोलँड या मागण्या मुसलमानांच्या नायेत. या देशातील आजच्या माव्वावादी अतिरेकी कारवाया चालू आहेत त्याचा आणि मुसलमानांचा काय संबंध? जे स्वतःला हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, आणि मुसलमान म्हणून घेतात आणि या देशाची अखंडता व सुरक्षिता याला धोका पोहोचवतात ते कुठले आले धार्मिक लष्कराच्या गुप्त बातम्या परदेशाला पोचवून या देशाच्या अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या अवलादिंची नाव एकदा जाहीर करावी लागतील. ज्या मुसलमानांच्या दैवतालात त्यांच्या व त्यांच्या वारसांना हिन लेखणाऱ्या रामगिरी यांना लष्करातील वीर चक्र परमवीर चक्र अशोक चक्र अशा राष्ट्रीय सन्मानाच्या पदकाने भूषवले आहेत हे राष्ट्रीय पुत्रांची नावांची यादी ही एकदा जाहीर केली पाहिजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजपर्यंत या राष्ट्राच्या कामी आलेल्या वीर मुसलमान सपूत्रांची गौरव गाथा एकदा गाऊनच दाखवली पाहिजे. सुवर्ण अक्षरात गडकिल्ल्यांच्या पायऱ्या पायऱ्यांवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायी आपले देह ठेवणारी ऐतिहासिक पुरुष एकदा यांच्या स्मरणात आणून दिले पाहिजे.
आधुनिक युगातील मिसाईल मॅन अब्दुल कलाम आझाद यांना विसरणारे रामगिरी पुन्हा या देशांमध्ये धर्माच्या नावावर जातीच्या नावावर हे राष्ट्र विभाजनाचा विडा उचलला आहे. रामगिरी एक व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे जी प्रवृत्ती या देशाला हानिकारक आहे. अशा लोकांना प्रतिष्ठा देऊन तुम्ही राष्ट्र विभाजनाला मदत करत नाहीत ना? या देशातील प्रत्येक गावात सर्वधर्मीय सुख समाधानाने आनंदाने गुणागोविंदाने नांदत असताना त्यांच्यात फूट पाडून वैरभाव निर्माण करणाऱ्या कसल्या राष्ट्रनिर्मितीची स्वप्न पाहत आहेत. ज्या गावागावात घराघरात राज्या राज्यांमध्ये व्यक्ती व्यक्ती मध्ये द्वेष असेल आणि इथला माणूस सुखी होणार नसेल तर या भौगोलिक भूभागाला जो फक्त आणि फक्त द्वेषाने भरलेला अशांत दुखी मानस दृष्टी विकलांग माणूस निर्माण करणार असेल तर अशा रामगिरी मुळे या देशाचे भवितव्य भविष्य आणि या देशाची अखंडता एकता बेभरोशी आहे. धार्मिक आतंकवाद या देशातील कोणालाही मान्य नाही अगदी परंपरेने आणि ऐतिहासिक दृष्टिकोन