विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील सौर इन्व्हर्टर चोरीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील सौर इन्व्हर्टर चोरीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती : बारामती येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम परिसरात बसविण्यात आलेला Havells Enviro GT सिरीजमधील 5 kW On-Grid Solar Inverter अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी इन्व्हर्टर भिंतीवरील माउंटिंगवरून काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात इन्व्हर्टरचे फिक्सिंग सैल करण्यात आले असून उपकरणाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, चोरीचा प्रयत्न अपयशी ठरल्याने इन्व्हर्टर घटनास्थळीच राहिला.

Advertisemen

ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची तसेच स्टेडियम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »