भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ बारामतीत 29 फेब्रुवारी रोजी बहुजन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा


बारामती दि.27 : भिवंडी येथील संकेत भोसले या १६ वर्षीय युवकाची तेथील समाजकंटकांनी जातीय द्वेषातून निघृणपणे हत्या केली. हि घटना आपल्या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी आहे.
या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी गुरुवार दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सदर मोर्चा बारामती शहरातील बुध्द विहार सिध्दार्थ नगर महात्मा फुले नगर सुहास नगर चंद्रमणी नगर – आंबेडकर पुतळा मार्गे – इंदापुर चौक गुणवडी चौक गांधी चौक – सुभाष चौक तसेच भिगवण चौक बारामती नगरपरीषदे समोर निषेध सभेचे आयोजन केले आहे.
सदर मोर्चाला बारामती शहर तालुक्यातील समस्त बहुजन समाजाच्या वतीने उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »