बारामती शहरातील मोकाट कुत्र्यांचा आठ दिवसात बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; युवा क्रांती जनकल्याण संघटनेचा इशारा!
बारामती : बारामती शहरातील मोकाट कुत्र्यांचा येत्या आठ दिवसात बंदोबस्त करावा. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद आपण घ्यावी. कुत्रे निर्बिजीकरण करण्याकरीता नगरपालिकेने ठेकेदार नेमला आहे. खोटे बिले काढण्याकरीता ठेका दिला जात असून लाखों रुपयांचे दर महिन्याला या ठेकेदाराचे बील काढले जात आहे. मात्र कोणतीच कारवाई करत नाही.
हॉस्पिटलमध्ये दररोज कुत्र्याने चावल्याचे रुग्ण येत आहेत. मोकाट जनावरे धरणाऱ्या व मोकाट कुत्र्यांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला दर महिन्याला लाखों रुपयांचे बिल अदा करण्यात येत आहे. आपण नियमित कर भरून देखिल आपल्या जीवाला धोका आहे. नगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे. कुत्रे पकडण्याचे खोटे बील काढत आहेत.
आरोग्य निरीक्षक यांचे ठेकेदारवर लक्ष नसल्याने ठेकेदाराची मनमानी वाढत चालली आहे असे यावरुन दिसून येत आहे. नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार फोन केले तरी फोन उचलत नाही. त्यामुळे या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी.
-मोईन बागवान
दरम्यान, बारामती शहरातील समर्थनगर परीसरातील दोघांना तर मंडई परीसरातील एकावर कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात जर यावर कारवाई न झाल्यास युवा क्रांती जनकल्याण संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा युवा क्रांती जनकल्याण संघटनेकडून देण्यात आला आहे.