कारवाई निश्चित होणार पण; 2 नंबरचे धंदे चालू राहणार?


बारामती – बारामती शहर व परिसरात मटका व जुगारीचा व्यवसाय खुलेआम पणे चालू आहे हे सांगण्यासाठी कोणत्या एटीएस ची गठन करण्याची गरज नाही हे जरी सत्य असले तरी सातत्याने या व्यवसायातील मालकांना खुलेआम संरक्षण मिळत आहे हे ही सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. अगदी गर्दीच्या ठिकाणी हे मटक्याचे व्यवसाय उघडपणे चालू आहेत अशा असंख्य तक्रारी बारामती शहर ग्रामीण तालुक्या मध्ये हा व्यवसाय खुलेआम तेजीत चालू आहे याबद्दलच्या तक्रारी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत दाखल आहेत आणि त्याच्यावर कारवाई झाली आहे. पण त्याच ठिकाणी त्याच मालकाचा धंदा उघडपणे चालू आहे अनेक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी समाज माध्यमांने चित्रफिती मटक्याच्या व्यवसायाची ठिकाण मालकाचे नाव एजंटचं नाव प्रसिद्ध केला आहे आणि कारवाई ही झाली आहे. जनसामान्यांना लुटून प्रशासनाची भरती करून पापाची खळगी भरणाऱ्या या दलिंद्री लोकांविरुद्ध कायम कारवाई करण्याचे धाडस इथल्या मर्द अधिकाऱ्यांमध्ये नाही.

Advertisemen

बारामतीतील मटका किंग धोत्रे हा किती कर्मचाऱ्यांना प्रशासनाला आर्थिक मदत करतो किती जणांचे संसार उध्वस्त करतो. हे इथल्या दुर्गा टॉकीज शेजारील कदम चौकातील लोकांना जाऊन विचारा त्याच्या गावगुंड सहकाऱ्यांना माज मस्ती आलेले आहे. किती गोरगरिबांवर अन्याय होत आहे त्याच्या मुख्य खोलीवर जिथे त्याचा आर्थिक व्यवहार पुस्तकं, मटक्याची पुस्तकं, तक्ते, व्हाया सांभाळणाऱ्या लोकांमुळे परिसरात त्याची किती मोठी दहशत आहे इथल्या पोलीस प्रशासनास ठाऊक आहे. पोलीस प्रशासन मालक सोडून एजंट वर कारवाई करण्यास भाव फलक जाहीर करतात व अशा मटक्यावाल्या धोत्रेसारख्या असंख्य लोकांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवतात बारामती शहर तालुका ग्रामीण मध्ये मटका चालवणाऱ्या व घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेही जात असतील. पण पोलीस कार्यालयात सन्मानाची वागणूक दिली जाते हेही तेवढेच निश्चित. बिसलेरी पाणी, गुटखा, सिगारेट, वडापाव पासून बिर्याणी पर्यंत त्यांच्यासोबत झिरो पोलीस हजर असतात. आता या धोत्र्यावर कधी हद्दपारची मकोकाची झोपडपट्टी दादाची साधी नोटीस सुद्धा बजावली नाही. बारामती एमआयडीसी तांदुळवाडी व सुशोभित सेंट्रल पॉईंट पूनावाला बागेसमोर चारचौघा देखत हा व्यवसाय चालू आहे. आता कारवाई होईल पोलिसांची धडक कारवाई, बारामतीचा सिंघम, 2 नंबर वाल्यांमध्ये दहशतीच वातावरण, मटक्याच्या जागेवरची अदलाबदल एजंटच्या जागेची अदलाबदल मटक्याच्या मालकांच्या भावात समझोता त्यातील चढ उतार याची मांडवली वसुली अधिकारी सगळ्यांना बोलवून सेटलमेंट करणार बोलणारांचे लिहिणाऱ्यांचे तक्रार करणाऱ्यांचे मतभेद सोडवून मन मिलन करणार गोडधोड वल्ली सुकी तिखट पार्टी होणार हे दुष्टचक्र कायम चालू राहणार. कारवाई निश्चित होणार पण 2 नंबरचे धंदे चालू राहणार?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »