असुरक्षित पोलीस एक वेगळा दृष्टिकोन
बारामतीत वृत्तपत्र व समाज माध्यमांमध्ये पोलिसांसंबंधी दोन बातम्या फिरत आहे एक तीन दिवस चकवा देणारी एक चार चाकी गाडी पोलिसांनी तीन दिवसांनी शोधली व दंड करून खटलाही दाखल केला तर दुसरी बातमी अशी फिरत आहे एक चार चाकी गाडीने एका पोलीस हवालदारास चिरडण्याचा प्रयत्न करून त्यास गंभीर इजा केली.
आज बारामतीकरांना या बारामती परिसरात पोलिसांवर हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो पोलीस कर्मचारी डोक्याला गंभीर मार लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर दुसऱ्या बाजूला गॉगल ग्लास लावून फिरणाऱ्या गाडीला बारामती मध्ये अनेक वेळा पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या कारवाईसाठी त्याला तीन दिवस लावले व प्रयत्नांची पराकाष्टा करून तीन दिवसांनी सदर इसमाच्या व त्याच्या गाडीला पकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून खटला दाखल केला
या दोन्ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमता इच्छाशक्ती त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल समय सुचक निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे तसेच जनसामान्यांच्यात पोलिसांबद्दल असलेली भावना व विचार याबद्दल एक चिंतणात्मक चिंतेचा विषय बनलेला आहे हे दोन्हीही चालक चार चाकी वापरणारे आर्थिकदृष्ट्या सदन असणारे कुटुंबातील असावे असा निकष काढायला काही हरकत नाही एक चालक चार चाकी च्या स्टंट करताना लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल युवकांना इजा होईल अशा पद्धतीने वाहन चालवत होता तर दुसरा चालक शासकीय नियमांचे पायमल्ली करून आपल्या चार चाकी ला गॉगल ग्लास बसवून गावभर फिरत होता या दोन्ही लोकांना कायद्याची कसलीही भीती नाही ही भीती कायद्याबद्दलचा आदर कायदा मानणारी मानसिकता या दोघांमध्येही नाही पोलीस आपलं काहीही वाकडं करणार नाही या माजक्या वृत्तीमुळे हे लोक समाजात वावरत होते असे असंख्य लोक आजही समाजात वावरत आहे
बारामती शहर ग्रामीण पोलीस कार्यालय डीवायएसपी कार्यालय किंवा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात फिरताना भेट देताना बातम्या घेताना एक गोष्ट सातत्याने निर्दशनास येत आहे या कार्यालयातून न्याय मागणाऱ्या लोकांना पिढीतांना अन्यायग्रस्त लोकांना वाईट वागणूक दिली जाते परंतु बेकायदेशीर काम करणाऱ्या व त्यांना संरक्षण देणाऱ्या मालक चालक व पुढारी देवाण-घेवाणीचे दलाल हे सातत्याने घिरट्या घालत असतात स्वतःला प्रतिष्ठित सुज्ञ नागरिक समजणारे हे सगळे हितसंबंधाचा व्यापार करून आर्थिक मंडई चालवणाऱ्या या प्रशासकीय यंत्रणेचे कार्यालय आर्थिक दृष्ट्या सदन लोकांना पुढार्यांना संरक्षण देत असल्याचे प्रकर्षणाने जाणीव होते सत्तेच्या जोरावर आपल्या बोटावर नाचणारी ही यंत्रणा पैशाच्या वजनावर गुन्हेगारी प्रवृत्तींना अभय देण्याचे पाप करते आणि समाजात शिस्त राहिली नाही कायद्याची जाण राहिली नाही स्व कर्तव्याची जाणीव नष्ट झाली आहे माणुसकी लोक पावली आहे अशा वलगवन्या करून समाजात दोष देणारे अपप्रवृत्ती प्रशासनात बोकाळले आहे
पोलीसच असुरक्षित असतील गावभर फिरणारी गाडी पकडायला तीन तीन चार चार दिवस लागत असतील तर या लाल फितीत बंदिस्त केलेला कायदा मोकळा श्वास कधी घेणार कायदा हा श्रीमंतांच्या घरची बटीका असते हे वाक्य मेंदूमध्ये घर करून बसलाय त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कायद्याचा आदर करणाऱ्या जनसामान्यांमध्ये या प्रशासनाबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाले आहे ही भावना बदलण्याची जबाबदारी आज प्रशासनावर येऊन ठेपली आहे
काल गणेश मार्केट परिसरात एक 60-70 वर्षाचा म्हातारा शेतकरी डोक्यावर टोपली घेऊन कोथिंबीर च्या पेंड्या विकताना एक पोलीस कर्मचारी त्यास अगदी कर्कश आवाजात पोलीस खाक्यात होता
” ऐ थेरड्या खालून वरून पिकलास तरी तुला अक्कल नाही का एक ठिकाणी बसून ईक की तिकडं पलीकडं” तो हे वाक्य बोलत असताना गुणवडी चौकात रस्त्याला वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या एका पांढऱ्या धुगाट फॉर्च्यूनर शेजारी उभा राहून खेकसत होता त्या फॉर्च्यूनर मधल्या कोणा एकाला नमस्कार करत हा त्याचा वाहतूक सुरळीत करण्याचा कार्यक्रम चालू होता हे पाहून आपण लोकशाहीत घटनेच्या अंमलात राहतोय का असं भला मोठा प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि सगळीकडे अंधार झाला होता
क्रमशः


