‘भावकी’च्या वादातून दाखल झालेल्या विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात दिराची निर्दोष मुक्तता!


दौंड: भावकीतील (नातेसंबंधातील) वैयक्तिक वादातून एका महिलेने आपल्या दिरावर विनयभंग आणि जबरदस्तीने घरात घुसल्याची खोटी तक्रार दाखल केल्याच्या प्रकरणात दौंड येथील न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. दौंड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दि. २२/०९/२०२५ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
दौंड तालुक्यातील वाळकी गाव येथील रहिवासी असलेल्या थोरात यांच्या विरोधात भावकीतील महिलेने यवत पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ३५४ (विनयभंग), ४५२ (गृह अतिक्रमण) आणि ५०६ (धमकी) अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा केवळ वैयक्तिक वादातून आणि भावकीच्या कलहातून दाखल करण्यात आल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सिद्ध केले.

Advertisemen

या खटल्यात आरोपी थोरात यांची बाजू ॲड. अजित बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली. ॲड. बनसोडे यांनी कोर्टात अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आलेला नाही, तसेच फिर्यादी महिलेच्या साक्षीमध्ये मोठी तफावत आढळली आहे.
वकिलांचे हे बुद्धी चातुर्य आणि सबळ युक्तिवाद ऐकून तसेच सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपीची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या खटल्यात ॲड. अजित बनसोडे यांना ॲड. अनिकेत ननवरे, ॲड. अभिजीत चाबुकस्वार आणि ॲड. शिलभद्र भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. भावकीच्या वादातून दाखल झालेल्या या खोट्या गुन्ह्यात दिराची निर्दोष मुक्तता झाल्याने सत्यमेव जयतेचा हा एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय ठरला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »