बारामतीत भूमिगत विद्युत योजना पाण्यात
बारामती मध्ये सध्या लाईटचा लपंडाव चालू आहे. क्षणाक्षणाला लाईट जात आहे. कधी तासाने येत आहे तर कधी दिवसभर गायब होत आहे. विद्युत वितरण विभागाचा महाराष्ट्रातील पहिले भूमिगत वायरलेस उपशहर म्हणून एक अत्याधनिक प्रणाली युक्त शहर बनवण्याचा अजित पवारांचा मनसुबा म्हणून अब्जावधी रुपये खर्च करून बारामती शहरांमध्ये विद्युत वाहक तारा जमिनीखाली गाडून 24 तास बारामतीकरांना विद्युत प्रवाह देण्याचा आश्वासन व त्याची कारवाही माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली अगदी दोन-तीन वर्षांमध्ये हे विकासकाम पाण्यात गेल्याचे अनुभव बारामतीकरांना येऊ लागला आहे. महावितरणाचे तांत्रिक अधिकारी सदरचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. रोजच्या रोज मुख्य विद्युत वाहिनीचा स्फोट होतोय बिघाड होतोय जेसीबीने वायर तुटलीय वायरिंग पूर्ण होत नाही ठेकेदाराने निष्कृष्ट दर्जाचे सामान वापरले गेले ठेकेदाराने देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नाकारल्याने सगळा भार विद्युत कर्मचाऱ्यांवर येत आहे. सदर काम विद्युत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केल्याचा आरोप तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव ठेकेदारातील टक्केवारीची देवाण-घेवाण विद्युत वाहिन्या अतिशय कमी खोलीवर टाकल्यामुळे उन्हाळ्यात अनेक विद्युत वाहिन्यांमध्ये स्फोट झाल्याच्या तक्रारी विद्युत वाहिन्यांचे जोड हे शास्त्रयुक्त पद्धतीने न बसवल्यामुळे सातत्याने जोड निकामी होऊन विद्युत प्रवाह खंडित होत आहे.
या कामातील अनेक जुने लोखंडी खांब दस्ताच्या विद्युत वाहिन्या अनेक रोहतके गायब झाल्याचे कर्मचारी आपले नाव घेता सांगत आहेत या ठेक्यामुळे अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामती आदर्श विद्युत पुरवठा करणारे शहर म्हणून विकसित करण्याची मंशा तात्काळ विद्युत कर्मचारी अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांनी पाण्यात घातले आहे.
वरील सगळं कऱ्हेच्या पाण्यात वाहून गेले पण बारामतीकरांना याचा भुर्दंड मानसिक शारीरिक त्रास का भोगायचा रोज पाणीपुरवठा खंडित होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होत आहेत अनेक विविध समस्यांना जनसामान्यांना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाचा कोट्यावधीचा निधी पाण्यात गेल्याने नवीन योजना सादर करण्याचा खटाटोप महावितरणचे मुख्य अधिकारी अजित पवारांना सांगत आहे. परंतु जुनी योजना अपयशी ठरली आहे. तांत्रिकदृष्ट्या निकामी झाली आहे याबद्दल भ्र शब्द काढायला तयार नाहीत. यात झालेला भ्रष्टाचार निष्कृष्ट दर्जाचे काम याबद्दल स्थानिक पुढारी महापुढारी सल्लागार तक्त्यात सामावले असल्याने “तेरी भी चूप आणि मेरी भी चूप” महावितरणाच्या वायरलेस बारामती भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा प्रकल्प आता भंगारात काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कर्मचाऱ्यांना रोज या बिघडलेल्या विद्युत वाहिन्या शोधता शोधता दुरुस्त करता करता नाकी नऊ झालं आहे. या चुकीच्या कामावर नियमबाह्य कामावर निष्कृष्ट दर्जाच्या कामावर पांघरून टाकून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नको नको झालं आहे. किती प्रश्न आणि त्याला काय उत्तर देणार या संभ्रमात रक्तदाब वाढलाय काहींचा कमी झालाय शरीरातली साखर कमी जास्त होत आहे. हृदयांचा झटका येण्याची शक्यता आहे. बारामतीला झालेला अर्धांग वायू आता विद्युत कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
बारामतीच्या लज्जेची जागा उघडी पडल्याने डोक्याला फेटा बांधून मुंडक्याची जाहिरात केली जात आहे. पण हे सगळं करूनही बारामतीकरांची समस्या दैवत सोडवल अशी भावना बारामतीकरांची आहे. हा अपयशी प्रयत्न किती जणांच्या जीवावर उठणार व किती जणांच्या खिशाला कात्री लावणार की या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कार्यक्षम सकाळी पाच वाजल्यापासून कामाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे बारामती तालुक्याचे महान सपुत्र या कामाच्या अपयशस्वी बद्दल चौकशीचे आदेश देणार का?