संपादकीय: शाई फेक हल्ला की, शहरी नक्षलवाद!
महाराष्ट्रामध्ये विचारांची लढाई विचाराने लढावी ही परंपरा फार पूर्वीपासून अवलंबवली जात असत. पण का कोणास ठाऊक महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली आणि विचारांच्या लढाई वरून प्रकरणे हातघाईवर आली. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांचे वंशज प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर शाई फेक करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न झाला वादाचा मुद्दा मुद्दाच नसून एक कुठील कारस्थान करून एका मराठा कार्यकर्त्याला अख्ख्या आयुष्याची कमाई पुण्याई कष्ट वाया घालवण्यासाठी हिसकावून घेण्यासाठी एका विकृत मनोवृत्तीने केलेला हा हल्ला फक्त निषेधार्थ नाही तर या महाराष्ट्राला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करत आहे.
आज महाराष्ट्रात मराठ्यांची सामाजिक ताकद दिसत आहे त्याचा मूलभूत पाया प्रवीण दादा गायकवाड व पुरुषोत्तम खेडेकरांनी भरलेला आहे त्यांनी मशागत केलेली वैचारिक जमीन आज नापीक झाली की काय? काय या जमिनीतील पिकांवर कोणी दरोडा घातला की काय असा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे.
पूर्वी मराठा समाजाचे फक्त राजकीय क्षेत्राकडे लक्ष असे राजकीय सत्तेसाठी व पक्षासाठी आपले जीवन पिढ्या अर्पण करणारे अनेक घराणे महाराष्ट्रात निर्माण झाली व आजही राजकारणात व अर्थकारणात कार्यरत आहेत
कालांतराने संभाजी ब्रिगेडच्या निर्मिती नंतर आत्मसन्मान आत्मभान व बहुजनवादी समाज निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून मराठा समाजाची प्रतिमा बहुजन समाज मान्य केली पण कालांतराने एका समाजाच्या समानार्थी शब्दाच्या विविध प्रश्नांवर लढणाऱ्या संघटना निर्माण झाल्या व यातूनच राजकीय अभिलेषा पायी राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून गळ्यात पट्टे घालून घेतले उजवी डावी सुरू झाली आणि यातूनच शिवधर्माची स्थापना झाली व शिवधर्म संस्कार विधी जन्मास आला या भारतात या शिवधर्माच्या स्थापनेची व संस्कार विधीची दखल तत्कालीन विचारवंतांनी लेखकांनी वृत्तपत्रांनी घेतली व त्याचे पडसाद भारतभर घुमू लागले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू धर्माचा त्याग करून हिंदू रितीरिवाजांना तिरांजली देऊन नवीन धर्म स्थापन केला व त्याचे नवीन नियमावली लिहिली प्रामुख्याने ब्राह्मण पंडित पुरोहित यांच्याकडून कुठलीही संस्कार विधी करून घ्यायची नाही किंवा आपल्या कुटुंबिक सामाजिक कार्यक्रमांना विधी वाहक म्हणून यांना प्राचारण करायचे नाही या सगळ्या विचारांचा विस्तार प्रवीण दादा गायकवाड यांनी भारतभर पेरून काढला अन इथेच माशी शिंकली
ज्या क्षणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदू धर्माचा त्याग करून सत्यशोधक समाजाची निर्मिती केली आणि ब्राह्मणी हिंदू धर्म समाज नाकारला तेथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले व सरता शेवटी महात्मा फुले यांनी स्थापना केलेला सत्यशोधक समाज काँग्रेसमध्ये जबरदस्तीने विलीन केला
इतिहासाची पुनरावृत्ती होते शिवधर्माच्या निर्मितीनंतर व त्याच्या आचारसंहितेच्या आग्रहानंतर संभाजी ब्रिगेडचे शकले झाली अनेक समविचारी पण अंतर विरोधाने भरलेल्या अनेक मराठा संघटना निर्माण झाल्या व वैचारिक लढाई सोडून तात्पुरत्या समस्यांवर चर्चा भाष्य व भविष्य होऊ लागले.
भांडारकर इन्स्टिट्यूट जेम्स लीन प्रकरण बाबा पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वतंत्र वीर सावरकर पंडित जवाहरलाल नेहरू द ऑर्गनायझर परमपूज्य गोळवलकर गुरुजी वरील अनेक उदाहरणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे चारित्र्य हणन करण्याचे काम झाले होत आहेत काल-परवा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे राहुल सोलापूरकर कोरटकर पुण्यातला मूत्रा कुलकर्णी यांच्या बद्दल हा भावनिक आक्रोश वैचारिक आक्रोश व आक्रमकता दिसली नाही दुर्दैव
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी होतोय या रागापाई प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर शाई हल्ला झाला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला असे असताना या विकृत प्रवृत्तींना शिवसेना या शब्दामधील शिव एकाकी वाटत नाही अनादरीत वाटत नाही छत्रपती शिवरायांचा अपमान वाटत नाही आता काय करायचं
भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतील ‘शिव’ या शब्दाचा अर्थ काय लावावा आणि कोणी सांगावा तो तसाच ठेवावा की बदलावा शाई फेक करावी आंदोलन करावं आत्मदहन करावं का कडेलोट करावा का हत्तीच्या पायाखाली द्यावा तुम्ही सुज्ञ आहात
प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या विकृत हल्ल्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत या विकृतीची जननी महाराष्ट्रातच आहे पण या विकृतीच्या सहमूळ नष्ट करण्यासाठी आपल्याकडे कुठलंही औषध नाही असं नाही जालीम इलाज आहे पण तो पचवण्यासारखं नाही तो इलाज करण्यासाठी शरीर मन बुद्धी इच्छाशक्ती त्याग याची परिभाषा पहिल्यांदा समजावी लागेल आणि हा इलाज इतका महाभयंकर आहे की त्याच्या 70 पिढ्या पुन्हा निपजणारच नाही पण जाती-धर्माच्या साकळदंडाने तुमचा मेंदू बांधलेला आहे धर्माचं कुलूप लावून वेडेपणाच्या अंधारे कोठडीत एका खोल समुद्रात गाडून ठेवलाय व ओ सामाबिन लादेन सारखा.. याचा अर्थ ही द्वेष जन्माला घालणारी जननी नुसती वांजुटी करून चालणार नाही तर तिला मातीमध्ये मिसळावी लागेल यासाठी शूर कर्तबगार कृतीशील विचारवंतांची पिढी निपसावी लागेल
क्रमशः