दादा क्लेश होतोय?


( बारामती संचार वृत्तपत्र ) आज काय महाराष्ट्रामध्ये मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवर बिन बुडाचे आरोप केले जात आहेत. या तथ्यहीन आरोपांना तोंड देता देता प्रामाणिक कार्यकर्ता थकलाय. तुमच्या सहकाऱ्यांनी केलेले काळे कृत्य तुमच्या आशीर्वादानेच केलं आहे, किंबहुना या काळ्या कृत्यात तुमचा प्रत्यक्ष हातभार आहे किंवा सहभाग आहे असे अपप्रचार चालू आहेत. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये तुमच्या हस्तक्षेपाबद्दल अनेक तर्क वितर्क, प्रचार, अपप्रचार आजही चालू आहेत. तुमच्या पक्षातील लँड माफियाबद्दल, प्रत्येक गावात तुमच्या हस्तक्षेप असल्याची गाव खेड्यात चर्चा आहे. या चर्चेमुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दादा खूप क्लेश होत आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांची प्रशासकीय कामं काही मिनिटात होतात. तुमच्या नावाचा फायदा घेऊन हे लँड माफिया सर्वसामान्यांना अक्षरशः देशोधडीला लावत आहेत. शंकेचे रावण करून या सर्वसामान्य कुटुंबांना रस्त्यावर भिक मागायची वेळ आणत आहेत. योगायोग म्हणावं की काय अशा लँड माफियांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अगदी काही दिवसांत खाजगी मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीच्या मूल्यांकनावर लाखांच्या मालमत्तेवर कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते. मौजे वंजारवाडी तालुका बारामती गट क्रमांक 144 या जमिनीवर वारस दावा क्रमांक 266/2022 हा दावा चालू आहे. बारामती जळोची शाखेच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 कोटी रुपये दिले आहेत. हे नियमबाह्य कर्ज वितरण तुमच्या आदेशाने तर झाले नाही ना? मग ठीक आहे. याविरुद्ध सामान्य शेतकऱ्यांना कर्ज वितरण करताना शंभर अडचणींचे समुद्र पार करावे लागतात आणि आल्यानंतर कर्ज नामंजुरीचा ठराव त्यांच्या समोर ठेवला जातो. मग प्रत्येक गाव खेड्यात पुण्या-मुंबईतल्या भूमाफियांना कर्ज दिल्याची एक चिठ्ठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अब्रू गावोगावच्या पंचायत फलकावर आक्रोश काढताना दिसते. हे सगळे काळे व्यवहार तुमच्यावर थोपले जातात. दादा क्लेश होत आहे.

Advertisemen

​बारामती सहकारी बँक ही तर भूमाफियांची जननीच आहे. न्यायालयात प्रलंबित प्रकरणावरती नवीन शर्तीच्या जमिनीवरली ज्या ७/१२ वरती फॉरेस्ट लिहिलं आहे, अश्या जमिनीवरती कोट्यावधी रुपये दिले जातात. हे विशिष्टच लोक आहेत ज्यांना हे कर्ज तात्काळ उपलब्ध केले जाते. याच्याशी तुमचा काहीही संबंध नसला तरी बदनाम तुम्हीच होणार आणि प्रत्यक्षात शिव्या आम्ही खाणार हे कुठपर्यंत चालणार आहे.
​काल पर्वा मौजे वंजारवाडी तालुका बारामती गट नं. १४४ यांच्या वारस नोंदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही पडळकर व शहा कुटुंबियांना बारामती सहकारी बँक जळोचीने आठ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. आणि हे कर्ज या जमिनीच्या किंमतीपेक्षा दहापट जास्त आहे. आणि योगायोगाने हे पडळकर व शहा कुटुंबिय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्या संपर्कात असल्याची बारामतीत चर्चा आहे. प्रत्येक नियमबाह्य कर्जाचा प्रत्यक्ष संबंध बारामती सहकारी बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याशी दुर्दैवाने आहे. आणि या दोन्हीही बँका नियमावलीच्या व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करून केलेले प्रकरण आहेत. बँकांचे ताळेबंद शासनाकडून कसे मंजूर करून घ्यायचे व अ वर्ग ब वर्ग अहवाल तयार करायचे हे तुमच्या पट्ट्याना चांगलेच माहितीये. तोट्यातली बँक नफ्यात कशी आणायची, नफ्यातील बँक दिवाळखोरीत कशी नेयची, सर्वसामान्य खातेदारांना अश्व कसा लावायचा. हे आर्थिक गैरव्यवहार कुशल बँक प्रशासनातील तुमचे नोकर तुम्हाला व शासनाला कसे फसवत आहेत हे मी तुम्हाला सांगावयास नको. फक्त एकच विनंती आहे. खूप क्लेश होतो तुमच्या या भूमाफियांमुळे गावोगावी खेडेपाडी या भूमाफियांच्या कुकर्मांमुळे सर्वसामान्य तुम्हाला बदनाम करत आहेत. आणि त्यांच्या पुराव्यानिशी केलेल्या आरोपांना आम्ही प्रतिउत्तर देऊ शकत नाही या भूमाफियांना व त्यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्यांना जरा आपल्या पद्धतीने व्यवस्थित समजून सांगा अन्यथा या आर्थिक गैरव्यवहारातून निर्माण झालेला असंतोष उद्या तुमच्यावर आभाळ आणू नये. कारण हा प्रश्न प्रत्येक पीडित कुटुंबियांचा आहे. आणि जेव्हा कुटुंबावर येते तेव्हा नेता निष्ठा आणि पक्ष निष्ठा क्षणात गळून पडते.
​— अभिजित कांबळे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »