असुरक्षित पोलीस एक वेगळा दृष्टिकोन; पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या
हे सदर चालू केल्यापासून पोलीस प्रशासनाला अजून किती प्रशिक्षण दिलं गेलं आहे दिले जात आहे व दिले जाणार आहे याचं अवलोकन सातत्याने केले जात आहे आधुनिक भारतात व पुढारलेल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस कर्तव्यावर असताना आणि नसताना त्यांचे काय उद्योगधंदे चालू असतात त्याची बारकाईने पाहणी केली जात आहे या देशातील सर्वोच्च पंतप्रधान यांनाही एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस अटक करू शकते व जेलमध्ये टाकू शकते हे भारतीय कायद्याचं व भारतीय संविधानाचे मोठेपण आहे पोलीस हा भारतीय समाजातील सर्वोच्च आदराचं पद स्वीकारणारा एकमेव शासकीय कर्मचारी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या कर्तव्याचे एक भाग आहे समाजातील अपप्रवृत्ती समाजाला इजा पोहोचवणारी हानी पोहोचवणारी कुठलीही व्यक्ती असो कायदेशीर माज मोडण्याची क्षमता फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणेमध्येच आहे सहारा सारखा कोट्याधीश उद्योगपती जेलमध्ये बसवणारा हा पोलीसच आहे अशा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना आमचे शतशः सलाम
आधुनिक युगाला हा चित्रगुप्त प्रत्येकाची पाप पुण्याची वही लिहिणारा व त्याच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक पाप पुण्य करणाऱ्या व्यक्ती व्यक्तीसमूहाला न्यायापर्यंत पोहोचवणारा एक देवदूत नर्क आणि स्वर्गाचं आरक्षण करणारा व ज्याच्या त्याच्या लायकी प्रमाने स्वर्ग नरकाचे दरवाजे खोलून देणारा एकमेव शासकीय कर्मचारी म्हणजे पोलीस
आजचा आधुनिक काळाचा चित्रगुप्त हा सगळ्या गुणांची वही घेऊन जेव्हा प्रभारी अधिकारी यमराज यांच्याकडे जातो तेव्हा कायद्याचा हासुड कोणाच्या पाठीवर पडेल व कोण रक्तबंबाळ होईल हे सांगता येत नाही आजचा चित्रगुप्त आधुनिक डिजिटल युगातला असल्याने त्याच्या आधुनिक गरजाही वाढल्या आहेत या गरजांप्रमाणे कर्तव्यापेक्षा जास्तीचे वेगळे काम या चित्रगुप्तांना करावे लागत आहे हे पाप आहे की पुण्य त्याची फळं काय मिळणार आहे याची जाणीव चित्रगुप्ताला नसावी म्हणूनच कर्तव्य पेक्षाही जास्तीची कामे आज प्रत्येक पोलीस लोकी घडत आहेत
नालासोपारा येथील एक बिल्डर बांधकाम व्यावसायिक या चित्रगुप्ताच्या कर्तव्य बाहेरच्या कामामुळे या जगातून नाहीसा झाला आहे गुन्हा दाखल झाला आरोपी अटक झाली तात्काळ किंवा पाच-दहा वर्षांनी सुटतील ही पण ज्या मनुष्य प्राण्याचा देह अनंतात विलीन झाला त्या मनुष्यप्राण्याच्या कुटुंबाच्या जबाबदारी चा प्रश्न निर्माण होत आहे घरचा कर्ता पुरुष गेल्याने घर उघड पडलं आहे ही न भरून येणारी झीज या मनुष्यप्राण्याच्या कुटुंबाला सोसावी लागणार आहे त्या कुटुंबाला होणाऱ्या जिवंतपणे च्या नर्क यातना व त्यास जबाबदार असणारे हे आधुनिक चित्रगुप्त जबाबदार आहेत 50 लाख रुपयांच्या मोबदल्यात अखंड कुटुंब कित्येक वर्ष दुःख भोगणार व या दुर्दैवी घटनेचा स्मरण करून शिव्या शाप देणार जेव्हा जेव्हा हे कुटुंब देवासमोर पूजा अर्चा करत असेल तेव्हा तेव्हा माझ्या व माझ्या कुटुंबाच्या या अवस्थेला जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा नायनाट व्हावं त्याला कधीही सुखप्राप्ती न होवो मला जशा असाह्य वेदना सहन कराव्या लागतात तशाच किंबहुना त्यापेक्षा जास्त यातना संबंधितांच्या कुटुंबीयांना होवो अशी प्रार्थना भगवंता समोर देवा समोर करत असेल तेव्हा ज्या मुला बाळांची बायका पोरांची आई-वडिलांची या कुकर्मा शी कुठलाही संबंध नाही असे असतानाही पापाचे धनी होऊन निसर्ग दुष्टचक्रामध्ये भरडले जाणार आहेत
पैसा संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता गाड्या घोड्या मोठ्या मोठ्या इमारती सोनं नाणं या संपन्न गोष्टी लेकरा बाळांना बायका पोरांना आई-वडिलांना सुख देतील का या अशा कर्तव्य पेक्षा जास्त काम करणाऱ्या पोलीस खात्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन करावे
दारू गुटखा गांजा जुगार इत्यादी सारख्या अनेक कुकर्मांना संरक्षण देऊन जमवलेली माया आपल्याला किती दिवस साथ देईल व आपल्या कुटुंबाला सुख देईल हा मूलभूत प्रश्न आहे
विषारी दारू ने हातभट्टीच्या दारूने मटक्याने जुगारीने उद्ध्वस्त झालेले कुटुंब व यात प्रथम बळी पडलेल्या माता भगिनी आपण रोज आपल्या इंद्रप्रस्थावर (पोलिस स्टेशन) पाहत असताल त्यांच्या व्यथा ऐकत असताल त्यांचा आक्रोश त्यांच्या मुलाबाळांच्या कोमोजलेले चेहरे वृद्ध आई-वडिलांचे लटपटणारे हात हा आपला दिनचर्या चा भाग आहे पण आपण या विस्कटलेल्या संसारांना मेडीपुडीचा आधार देणार आहात का हे आपल्या प्रशासकी सेवेत बसत असेल तर एकदा कर्तव्य पेक्षाही जास्तीचे काम करून पहा आनंद कशाला म्हणतात समाधान कशाला म्हणतात याची अनुभूती व्यक्त नक्की होईल व आपण खरेच चित्रगुप्त असल्याचा अभिमान प्राप्त होईल अन्यथा नालासोपाराच्या सारखा बंदीवान बनून आयुष्यभर लेकरा बाळांच्या नजरेतून समाजाच्या नजरेतून तीळ तीळ झिजून मेल्याशिवाय पर्याय नाही

