बारामतीत मुस्लिम दफनभूमीच्या जागेची मागणी


आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार
राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)

यांच्या सेवेत..

आदरणीय साहेब..

आपल्यासारख्या सर्व अष्टपैलू विचारवंत राजकारणी समाजकारणी शिव शाहू फुले आंबेडकर विचार वाहक सर्वधर्मसमभाव सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन प्रत्येकाचा विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्या प्रत्येकाच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या चरणी सादर प्रणाम

साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीबोळापासून ते महाराष्ट्राच्या राजधानी पर्यंत प्रत्येक मुस्लिम बहुल गल्यांमध्ये “तुतारीला” मतदान पेटीत आघाडी मिळाली आहे. आपल्या विचाराशी व कार्याशी इमान राखून आम्ही आपणास भरघोस मतदान देऊन आपणावर विश्वास प्रकट केला आहे.

साहेब, बारामती मध्ये मुस्लिम समाजाला पोटाची खायची भ्रांत असून बारामतीच्या विकासापासून हा समाज लाखो योजे दूर आहे. स्वतः काबाडकष्ट करून कसेबसे अर्धा पोटी खाऊन जीवन कंठीत आहे. इथपर्यंत सर्व ठीक आहे पण या मरण यातना भोगून खरंच मेल्यानंतर आपल्या मड्याला चिरशांती मिळत नाही हे आमच्या समाजाचे दुर्दैव.. आपल्या राजकीय आयुष्यामध्ये आपण बारामतीतील मुस्लिम समाजाला एक दफनभूमी देण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती

Advertisemen

येथील दफनभूमीत हाडांचा खच पडला असून माती नामशेष झाली आहे. दफनभूमीत निम्म्यापेक्षा जास्त जागा ही कायम कबरी असून त्या कबरीना हात लावणे आता शक्य नाही. त्या कबरीचे वारस त्या कबरीचे मालक झाले आहेत. ते आता मालकीयत दाखवत आहेत. मी काय सांगत बसलोय साहेब तुम्हाला पिढ्यांना पिढ्या वर्षानुवर्ष ही आमची समस्या आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एक सुसज्ज अशी दफनभूमी आपण आपल्या कार्यकाळात द्यावी

साहेब आपले आणि मुस्लिम समाजाचे गेले कित्येक वर्षाचे प्रेम पूर्ण वैचारिक नाते आहे. असे असतानाही गेले कित्येक वर्ष आमच्या मयत आजोबा आजींना मृत्यूनंतर चिरशांती बारामतीत लाभत नाही. त्यांचा श्राप आम्हा लेकरा बाळांना नरक यातना सहन करायला लावतोय त्यामुळे आमच्या पूर्वजांना चिरशांती लाभण्यासाठी आपल्या एक सहकार्याची अत्यंत निगडीची गरज आम्हास आहे. जिवंत असताना देह व मन यातना शोषून या व्याकुळ झालेल्या टिचलेल्या या देहाला मरणोत्तर शांतता लाभावी ही आपल्या हाती काम आहे. आपल्या आयुष्यात हे पुण्याचे काम आपण करावे. आम्हा मुस्लिम समाजाला एक सुसज्ज अशी दफनभूमी आम्हास मिळवून द्यावी व असंख्य बारामतीकर मुस्लिम समाजाची दुआ घ्यावी..

आणि साहेब शक्य झाले तर संसद रत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे व माननीय आमदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना या पुण्याच्या कामात योगदान देण्यास आपण त्यांना सहभागी करून पवार कुटुंबीयांना आमच्या धर्मशास्त्रानुसार दुआ सवाब देण्यास निमित्त मात्र व्हावे. आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो आपल्या कुटुंबीयांचे भरभराट व्हावं अशी अल्लाहाकडे दुआ करतो.

आपला
मोईन बागवान
संपादक बारामती संचार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »