शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
बारामती, दि.25:- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापुर रोड, बारामती व मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), घाटगेवस्ती, बयाजीनगर या वसतिगृहात प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.
वसतिगृहामध्ये बारामती शहरातील शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेशित व इयत्ता 11 वी पासून पुढील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात गुणवत्तेवर आधारित (मेरीट बेसिस) मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात 75 आणि मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) वसतिगृहात 60 मुलांकरीता जागा आहेत. वसतिगृहात एकूण जागेच्या 85 टक्के जागा ह्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून भरण्यात येतात तर उर्वरित 15 टक्के जागा उर्वरित प्रवर्गातून भरण्यात येतात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येते. तसेच दरमहा 500 रुपये निर्वाह भत्त्यासह इतर भत्तेही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.
अधिक माहितीसाठी गृहपाल ए.आर. भालके (भ्र. क्र.-8275012974), कनिष्ठ लिपिक एच. एस. पिसाळ-(भ्र.क्र. 7775980737), सी.बी.गीऱ्हे भ्रमणध्वनी (भ्र.क्र. 9158984031) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात येत आहे.
https://hmas.mahait.org/ – अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.


