संपादकीय : हिंदुस्तान धुमसतोय!


हिंदुस्थानाच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये जनक्रांती झाल्यानंतर नेपाळी संसद मंत्र्यांची घरं क्रांतिकाऱ्यांनी पेटवून दिली व नेपाळी सरकारला खाली खेचले. मंत्र्यांना रस्त्याने तानू तानू मारले या घटनेची माहिती संपूर्ण जगाला समजल्यानंतर जगातील सर्व वृत्तपत्र टेलिव्हिजन समाज माध्यमं खळबळून जागे झाले व एका राष्ट्राच्या सरकारचे पतन होताना समक्ष आपल्या डोळ्याने पाहू लागले. नेपाळमध्ये राजेशाही संपल्यानंतर जनतेने लोकशाही स्वीकारली व या लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी देशाची लूट करून आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी उद्योगधंद्यांसाठी पाठवले व नेपाळचा पैसा त्यांच्यावर खर्च करून मुलांना उच्च प्रतीचे जीवनमान उपभोगायला दिले. नेपाळमधील तरुण व विद्यार्थ्यांनी असंतोषाची लाट पसरवली लोक रस्त्यावर उतरले या जनप्रक्षोभाला थांबवण्यासाठी सरकारने नेपाळमध्ये 27 विविध भ्रमणध्वनी ॲप तात्काळ बंद करून लोकांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न केला व लोकांमध्ये या कृत्याचा उलटा परिणाम होऊन जनप्रक्षोभ वाढला व नेपाळमधील संसद कार्य प्रणाली संपुष्टात आणण्याचे कार्यक्रम तिथल्या क्रांतिकाऱ्यांनी केला.

नेपाळमध्ये घडत असलेल्या घडामोडी या विविध माध्यमांमध्ये दाखवत असताना समाज माध्यमांवरील बंदीमुळे लोक असंतोष पसरल्याचे वृत्तांकन सर्व आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी व वृत्तपत्रांनी दाखवले लिखाण केले परंतु वास्तवात वेगळेच कारण समोर आले आहे. हिंदुस्थानचे व नेपाळचे रोटी बेटी व्यवहार कित्येक दशकापासून चालू असून हिंदुस्थान नेपाळ सीमा खुली असल्याचे आजपर्यंतचा अनुभव आहे. पण नेपाळमध्ये तेथील जातीव्यवस्था धर्मभेद भ्रष्टाचार यामुळे जनसामान्यांच्यात निर्माण झालेल्या रोषातून ही राजकीय क्रांती झाल्याचे निष्पन्न होत आहे. राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांकडे सत्ता एकवटवली व त्यांच्या वंशजांना त्या सत्तेचा भरपूर फायदा करून दिला. राष्ट्रापेक्षा कुटुंब धार्जिन राजकारणी नेपाळमधील सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच दमण तंत्राचा वापर करून सर्वसामान्यांना संविधानिक हक्क आणि अधिककारांपासून वंचित ठेवले. विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनी राजसत्ता व प्रशासकीय सत्ता आपल्या ताब्यात ठेवून बहुसंख्या नागरिकांना सुख सुविधांपासून वंचित ठेवल्याचा हा परिणाम आहे.

नेपाळमध्ये 1992 साली एक धार्मिक संस्थेची स्थापना करण्यात आली व या धार्मिक संस्थेचे लागेबांधे हिंदुस्थानशी संबंधित आहे. या धार्मिक संस्थेने नेपाळमध्ये धार्मिक कट्टरतेचा प्रचार करून हे राष्ट्र विशिष्ट धर्माचे व्हावे असावे असा आग्रह धरून सरकारला हाताशी धरून नेपाळमधील प्राचीन परंपरा संस्कृती मोडीत काढून विशिष्ट धर्माच्या आचारसंहिता लागू केली आहे. यातूनच तिथे ज्येष्ठ व कनिष्ठ अशी भावना जनसामान्यांच्यात निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये एकूण 12 टक्के लोकसंख्या असणाऱ्या या दोन जातींनी 88 टक्के लोकसंख्येचे शोषण व दमन केले व या दमनास हिंदुस्तान जबाबदार असल्याची भावना नेपाळीन मध्ये तीव्र झाली असून या आंदोलनात हिंदुस्तानने हस्तक्षेप करू नये हिंदुस्तानीय वृत्तपत्र इतर माध्यमांना आंदोलकांनी मारहाण करून मुंडन करून तिथून वार्तांकन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे हिंदुस्तानच्या शेजारील राष्ट्रात जाती व्यवस्थेबद्दल धर्म कट्टरतेबद्दल व भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळी जनतेने केलेला उठाव हिंदुस्तानी सर्व माध्यमांनी उचलून धरला व हिंदुस्थानात होत असलेल्या दमनाबद्दल व शोषणाबद्दल धार्मिक कट्टरतेबद्दल टेलिव्हिजनवरती समाज माध्यमांमध्ये वृत्तपत्रातून चर्चासत्र आयोजित केली प्रकाशित केली व प्रचारित केली. हिंदुस्थानातील समाज व्यवस्था व नेपाळमधील समाज व्यवस्था राजकीय व्यवस्थे बद्दल धार्मिक व्यवस्थेबद्दल तुलनात्मक विवेचन हिंदुस्थानातील सर्व भाषांमध्ये चर्चा होऊ लागली व यातून आत्मचिंतन सुरू झाले. ज्या जाती व्यवस्थेने वर्णव्यवस्थेने धार्मिक कट्टरता वादाने या हिंदुस्थानाला हजारो वर्ष गुलाम करण्यास ठेवण्यास मदत केली. त्या इतिहासाची पुनरावृत्ती हिंदुस्थानात होत असल्याची तीव्र जाणीव हिंदुस्तानी मनाला होऊ लागली व यातूनच हिंदुस्तानात एक सुप्त वैचारिक वादळाने जन्म घेतला असल्याने आता हे वादळ हिंदुस्तानाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हिंदुस्तानी युवक व विद्यार्थ्यांवर येऊन पडल्याची जाणीव तरुणांमध्ये दिसत आहे.

Advertisemen

हिंदुस्थानातली पायी चालत येणारी अंगठेबहादूर सरपंचीन बाई पाच वर्षात पक्क घर बांधून चार चाकीत फिरते हा प्रत्येक हिंदुस्थान्याचा अनुभव आहे. मग या देशातील आमदार खासदार इतर राजकीय पुढार्‍यांची आर्थिक परिस्थिती इतक्या लवकर का बदलते याची चर्चा गावकुसामध्ये चालू झाली आहे. या भ्रष्टाचारामुळे भ्रष्ट व्यवस्थेमुळे भ्रष्ट मनोवृत्तीमुळे सर्वसामान्यांची लेकरं देशोधडीला लागली असून राजकारणी गब्बरगंड होत असताना हिंदुस्थानी समाजाने फक्त पाहत राहायचं का? नुसतं सहन करत राहायचं का? संविधानाने दिलेले हक्क अधिकार कोणीतरी वरबडून घेतं आणि पाच वर्षाच्या कालखंडामध्ये गब्बर होतं अशा भ्रष्ट व्यवस्थेचे लाभार्थी आज हिंदुस्थानात चिंतेत आहेत. कर्मठ धर्मवेडी स्वतःला घरबंदी करून बसलेले आहेत. प्रत्येक वृत्तवाहिन्यांमध्ये हिंदुस्थानातील भ्रष्ट कारभाराची जिवंत उदाहरण समाज माध्यमातून प्रसिद्ध केली जात आहे. धर्माच्या धंद्याचे अनेक उदाहरणं आज हिंदुस्थानासमोर येत असून याबद्दल लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. हिंदुस्थान हा असा देश आहे जिथे घराणे शाही पदोपदी जाणवत असून पोसली जात आहे. ज्या घराणे शाही विरुद्ध नेपाळ पेटून उठले व राजेशाही संपुष्टात आणली त्या राजेशाही चे आग्रह पुन्हा नेपाळमध्ये केला जात होता. हिंदुस्थानातील पाच पंचवीस घराणे हिंदुस्तानीय सत्ता स्थानात गेले स्वातंत्र्योत्तर काळात ते आजपर्यंत आहेत. ज्या राजेशाही घराण्यांनी अनेक परकीयांचे आक्रमणाना मदत केली व त्यांची चाकरी स्वीकारली अशी घराणे जे इंग्रजांचे मोघलांचे चाकर होते तेच आज या हिंदुस्थानाचे सत्ताधारी मंत्री संत्री आहेत. याची तीव्र जाणीव समाज मनाला आता होत आहे. ज्या जातीविरुद्ध विचारधारे विरुद्ध नेपाळमध्ये उठाव झाला तीच विचारधारा आज हिंदुस्थानात थैमान घालत आहे. राजसत्तेच्या माध्यमातून धर्मसत्ता व धर्म सत्तेच्या माध्यमातून शोषण व दमण हा कार्यक्रम नेपाळी जनतेने उलथून टाकला आहे.

हिंदुस्थानातील अनेक राज्यकर्त्यांच्या खानदानाची त्यांच्या नातेवाईकांची खानदान शोध मोहीम आजच्या तरुणांनी विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानात चालू केली आहे. अनेक विचारवंत समाज शास्त्री इतिहास तज्ञ लोक अशा खानदानांचा भूतकाळ शोधून वर्तमान काळात त्यांचे खरे रूप लोकांसमोर आणत आहेत व कालचे गद्दार आजचे राष्ट्रभक्त एक एक करून समाज माध्यमांतून समोर प्रकट होत आहेत. त्यांची खानदान खानदानांची पोलखोल आता कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत या ढोंगी राष्ट्रभक्तांनी हिंदुस्थानाची केलेली लूट व इथल्या जनतेचे केलेले शोषणाचा पाढा वाचला जात आहे.

हिंदुस्थानातील कटू इतिहास सांगतो की हिंदुस्थानात कधीही लोकक्रांती झालेली नाही प्रत्येक सत्ताही आंतर विरोधातून रक्तरंजित खुणी सत्ता परिवर्तन झालेला आहे. त्यामुळे हिंदुस्थानात जनक्रांती होण्याची शक्यता ढिसुळ असून धर्मवेढया लोकांनी निर्धास्थ राहावे. हजारो वर्ष येथील अस्पृश्य समाजावर अमानवी अत्याचार झाल्यानंतरही क्रांती झाली नाही. कुठलेही सत्ता परिवर्तन करण्याचे सामर्थ्य इथल्या कुठल्याही शोषित समाजामध्ये नसून नेपाळ सारखी पुनरावृत्ती हिंदुस्थानात होणार नाही. ज्या बांगलादेशची निर्मिती हिंदुस्तान ने केली त्या हिंदुस्थानात आज बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानाचा निषेध करत आहेत. म्हणजेच हिंदुस्तानी राज्यकर्त्यांना शेजार धर्म पाळण्याची वृद्धंगत करण्याची कला नसल्याचे सिद्ध झाले आहे. हिंदुस्तान अफगान हिंदुस्तान पाकिस्तान हिंदुस्तान नेपाळ हिंदुस्तान शेजारील कुठल्याही राष्ट्राशी चांगले संबंध नसून वितुष्ट वाढवण्याचे काम हिंदुस्थानातील विकृत मनोवृत्ती करत आहेत. हिंदुस्थानाने आंतरराष्ट्रीय संबंधांची जाण हिंदुस्तानी सरकारला नसून त्यामुळे हिंदुस्थानात वैचारिक संघर्ष धार्मिक संघर्ष जातीय संघर्ष व आर्थिक संघर्ष परिकोटीला पोहचला आहे. या संघर्षातून उद्या जनक्रांतीची परिवर्तनाची नांदी समजून हिंदुस्थान आता धुमसत आहे. हा वैचारिक अणुबॉम्ब केव्हा फुटेल याचा नियम नाही.

या सगळ्या संघर्षाची दखल हिंदुस्तानी न्यायव्यवस्थेने घेतले असून हिंदुस्तान फक्त आणि फक्त संविधानाने दिलेल्या नियमावली प्रमाणे चालणार कोण राष्ट्रपती पंतप्रधान असा प्रश्न विचारून न्यायालय कुठल्याही असंविधानिक घटनेवर कारवाई करणार कुठलीही संविधानिक संस्था जर संविधानाप्रमाणे काम करत नसेल त्यावर न्यायालय हातावर हात धरून बसणार नाहीत. असे हिंदुस्तानी सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हिंदुस्थानातील संविधान विरोधकांची तारांबळ उडाली असून या देशांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत कधीही अशी भूमिका घेतली नव्हती परिणामी या देशात असवैधानिक कृत्य सर्वोच्च न्यायालय स्वतःहून दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करेल. जे शासन न्यायालयाचे निर्देश आदेश मानणार नाही त्यांना त्याचे परिणाम तात्काळ भोगावे लागतील. याची जाणीव आज हिंदुस्थानातील प्रत्येक संविधान धार्जिन नागरिकाला झाले असून या परिवर्तनाच्या हवेच वादळ होऊन ही भ्रष्ट व्यवस्था उलथून टाकण्यासाठी हिंदुस्तानी सज्ज झाले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »