संपादकीय : बारामतीकरानों सावध !
संपादकीय : बारामती मध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे संरक्षण संगोपन आणि विकास केला जात आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात बारामती संचार एक अभियान छेडत असून..
जनहितार्थ अशा प्रवृत्तींचा पडदाफाश करत आहोत जेणेकरून शासन, प्रशासन यांना कायदा सुव्यवस्था आणि महसूल अबाधित राखण्यासाठी मदत होईल.
आपणास जाहीर आवाहन व नम्र विनंती करत आहोत, की या सदरामध्ये होत असलेल्या व होणाऱ्या गुन्ह्यासंबंधीची सूचना माहिती आपणास देत आहोत. असे काय घडत असेल किंवा घडणार असेल तर बारामती संचारला संपर्क साधून आपली बारामती, सुरक्षित बारामती, सुंदर बारामती, पर्यावरण पूरक बारामती बिंदास व निर्दास्त राहण्यासाठी भारतातील सुरक्षित सुंदर बारामती करण्यास प्रशासनाला आपल्या सहकार्याची व मदतीची नितांत आवश्यकता आहे.
बारामती व बारामती परिसरात सफेद काळे गुन्हे घडत असून बारामती मध्ये नुसते कोयता गॅंग सक्रिय नाही तर बारामती हे कट्टे, पिस्तूल, रीवाल्वर यांचे माहेरघर झाले आहे. हप्ता खोरी, जुगार, मटका, केमिकलची दारू, रासायनिक दारू अशा आधुनिक गुन्हेगारीच्या प्रवृत्ती बारामती मध्ये काही समाज बाधक शासक प्रशासक निर्माण करून त्याचे पोषण करत आहे. सत्तेच्या लालसापाई अल्पवयीन निष्पाप मुलांना टोळी युद्धासाठी तयार करून बारामती शहर व बारामती तालुका अशांत करण्याचा असुरक्षित करण्याचा कटकारस्थान बारामती शहर व तालुक्यामध्ये चालू आहे. शासन व प्रशासन आपमतलबी प्रवृत्तीमुळे त्यांना बारामती शहर व तालुका असुरक्षित व मानसिक दृष्ट्या गुलाम बनवायचा आहे. शांतता व सुव्यवस्था या शब्दाचे अर्थ विसरलेले शासन प्रशासन तुमचे भविष्य तुमची मुलं उध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत. बारामती व बारामती परिसरात लँडमाफिया, शिक्षण माफिया, बिल्डर माफिया, गौण खनिज माफिया असे माफीयांचे हजारो प्रकार बारामती मध्ये आधुनिक रूप घेऊन प्रकट झालेले आहेत व अशा माफीयांना संरक्षण देणे व त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी पांढरी खादी आणि खाकी करत आहे. यातील बळी जाणारे लोक यांच्या माहितीसाठी व त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहावे शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध व्हावे व आशा वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालून या विषवेली बारामती व बारामती परिसरात आपला फास आवळून बारामती व बारामतीकरांचा घात करण्या अगोदर या सगळ्या प्रवृत्ती सहमूळ उछाटन करून नायनाट करण्यासाठी हे सदर लोक हितासाठी चालू केले आहे. बारामती व बारामती परिसरात चालू असलेले सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर कृत्य अंगी आपल्यासमोर पुराव्यानिशी आपल्या समक्ष सादर करत आहोत. या सदरामध्ये संपूर्ण माहिती वस्तुनिष्ठ सत्य असेल अशा घटना जर आपल्या परिसरात घडत असतील तर आपण शासन प्रशासन व बारामती संचारला संपर्क साधावा ही विनंती उद्यापासून हे सदर आपल्या हितार्थ लोक हितार्थ चालू करत आहोत कृपया आपले मत जरूर मांडावे व आपले भविष्य आपले म्हातारपण आपल्या आई बहिणीच्या अब्रू आपले व्यवसाय सुरक्षा ठेवावे ही कळकळीची विनंती..
आपला
मोईन बागवान
संपादक- बारामती संचार
उद्या वाचा
विकसित बारामतीचा पार्किंग खेळ खंडोबाचा आर्थिक हितसंबंध