विकसित बारामतीच्या पार्किंगचा खेळ खंडोबा व आर्थिक हितसंबंध


“बाई गं! फुटपाथ वरून चालणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण” काय ते रस्त्याला वाहतूक? गाडी चालवणं तर मुश्किल झालंय लोक म्हणतात बारामतीचा विकास झाला बारामतीचा विकास झाला पण इथल्या वाहतुकीला तर नियमच नाही मेल्या बिल्डरने अख्ख वाहनतळ विकून टाकलं आणि नुसते व्यापारी गाळे काढले नगरपालिका झोपली की काय मेल्याने कॅनॉलच्या पुलाचं तर वाटुळच केलं सिटी सेंटर चौक की (येडा) येड…. चौक झालाय एका चौकात दहा-बारा पोलीसं त्यांना सुद्धा वाहनं हाकता येईना आणि म्हणे बारामतीचा विकास झालाय..

बारामती संचार ने आपणास शब्द दिला होता बारामतीतील विकास हा नियोजन शून्य दृढदृष्टीचा अभाव व मूर्खपणाचा कळस आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही काही हा आर्थिक गौडबंगाल आहे. आम्ही आज या लेखांमध्ये हुतात्मा चौक बारामती नगरपरिषद समोर ते पेन्सिल चौक वाया संयोग गृहनिर्माण संस्था या देखण्या खूबसूरत परिसराचा वाहतुकीचा काळाबाजार कसा झालाय याचा खोल खोल करत आहोत. विकासाच्या नावावर आर्थिक नफेखोरी कशी केली जाते. नियमांना घोडे लावून घोड सवार कसं होता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हुतात्मा चौक ते पेन्सिल चौक वाया संयोग सोसायटी

आई-बापांनो मित्र-मैत्रिणींनो हितचिंतकांनो बुद्धीवाद्यांनो व या परिसरात रोज प्रवास करणाऱ्या प्रवासी बारामतीकरांना बारामतीचे गोडवे गाऊन रोज लाख ठेवण्यातल्या शिव्या देणाऱ्या मतदार बंधू भगिनींनो या परिसरात निर्माण झालेल्या देखण्या इमारतींना किती ठिकाणी वाहनतळ आहेत. ही वाहनतळ हरवली गेली, चोरीला गेली, का विक्री केली गेली आहेत. बारामती नगरपालिकेच्या अंध प्रशासनाला हे दिसत नाही का? लाखो रुपयाची लाच घेऊन घर भरणारी ही जातीवंत अवलाद रोज बारामतीकरांना आर्थिक व मानसिक छळवाद करत आहे आणि या छळवादी विरुद्ध मुख संमती देत दुःखाने आनंदाने सहन करत आपल्या वाहनांना कसेही अस्तव्यस्त रस्त्यावर उभे करून पार्क करून आपल्या वाहनांच्या चोरीची वाट पाहत चिंताक्रांत आपला दैनंदिन व्यवहार करत आहेत.

Advertisemen

या बारामतीमध्ये “मुकी हाकली हकना बोंब” या म्हणीप्रमाणे दिनचर्या चालू आहे नामर्द प्रवृत्तीच्या इथल्या नागरिकांना आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीवच नाही. सिटी सेंटर चौक बारामतीचा आत्मा अपंग, विकलांग, संवेदना शून्य, व्हेंटिलेटरवर असलेला 12-15 कर्मचारी त्याच्या सेवेत या पुलाची निर्मिती करताना किती वेळा बदल झाले? किती ठेकेदार बदलले? किती जणांनी कमिशन घेतले? किती तज्ञ विद्वान वास्तु विशारद नेमले? किती वेळा खर्च वाढवून दिला? तरी देखील हा रुग्ण (येडा चौक) आजही अतिदक्षता विभागातुन बाहेर निघायला तयार नाही. पार्किंग मध्ये इमारत मालकांना कोट्याचा फायदा करून देताना बारामती नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी किती मलिदा खाल्ला तेच आता सांगतो. इमारत बांधण्यापूर्वी इमारत परवानगी देताना त्याला बांधकाम आरंभ दाखला म्हणतात हा दाखला घेताना बारामती नगरपालिकेचे लाखो रुपयाचे शुल्क आकार आकारतात. त्यातच मुख्याधिकारी व मुख्य अभियंता यांचे खाजगी शुल्क वेगळ्या असते बरं का! त्यानंतर अनेक नकाशातल्या चुका दर्शवून वेगळेच फी आकारली जाते. ते दुरुस्त करून घ्यायचे नसेल तर दाम दुप्पट खासगी आकारणी केली जाते. बांधकाम आरंभ होते नारळ फोडला जातो श्री गणेशा: नियमानुसार बांधकाम केले जात नाही. इमारतीच्या चारी बाजूने अग्निशामक नियमाप्रमाणे दोन इमारतीच्या मधले अंतर हे अग्निरोधक नियमाचे पालन करून बांधणे आवश्यक आहे. परंतु प्रत्येक स्क्वेअर फुटाला दहा हजार वीस हजार रुपये मिळत असल्याने तेवढी जागा वाया घालवायची का? म्हणून जागा मालक, इमारत मालक व विकासक यांच्या संगनमताने आणि सगळ्या नियमांना घोडा लावून हे बांधकाम सुरू केले जाते. त्यातीलच एक हितचिंतक बारामती नगरपरिषदेला तक्रार देणारा एक दलाल निर्माण करतो आणि पुन्हा आर्थिक गौडबंगाल सुरू होतो. इमारतीच्या भोवती व इमारतीच्या खालील वाहन तळाचे पार्किंग बंद केले जाते.

हा लेख जरा मोठा होत असल्याने वाचकांना व समजून घेणाऱ्यांना जरा जड जात आहे त्यामुळे उर्वरित पुढील अंकी वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »