एमआयडीसी परिसरातील अव्यवहार !
बारामती– बारामती तालुक्यातील रोजगार निर्मिती व बारामतीच्या विकासाच्या उद्दिष्टाने बारामती मध्ये एमआयडीसीचा विकास व विस्तार झाला. या विस्ताराबरोबर व विकासाबरोबर अनेक समस्या निर्माण झालेले आहेत. बारामतीच्या विकासाचा टेंबा मिरवणारे व मी विकास केला आमच्या कुटुंबाने विकास केला असे म्हणणारे अति विद्वान लोकांना या विकासाबरोबर येणाऱ्या समस्यांची जाणीव अजिबात नव्हती असं नाही. परंतु या समस्यांचा निराकरण करण्यापेक्षा या समस्यातून आर्थिक लाभ कसा घ्यायचा याची पूर्ण जाणीव या पोंगा पंडितांना चांगली माहित आहे. एमआयडीसीतील जमिनीच्या आरक्षणात पूर्वी राजकीय बगलबच्च्यांना या परिसरातल्या जमिनी कवडीमोल खरेदी करण्यास सांगितले गेले व तेथील मूळ निवासी यांना भूमिहीन करून टाकले. परिणामी गावकुसात राहणाऱ्या शेतकरी, मजूर हा भूमिहीन व मजूरीहीन झाला.
जळोची, रुई, सावळ, तांदुळवाडी, कटफळ, गोजूबावी इत्यादी शेतकरी भूमीहीन झाले. एमआयडीसीमध्ये भूमालकांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्राधान्याने नोकरी व व्यवसाय दिला जाईल व बारामती एमआयडीसी परिसरातील गावांना सोन्याचे दिवस येतील व रामराज्य निर्माण होईल अशा स्वप्नांनी गावकऱ्यांना भुरळ घातली व गावगाडा बारा बलुतेदार शेतमजूर शेतकरी उध्वस्त झाली. हेच काय कमी होतं म्हणून पवार, धोत्रे, काजळे त्यांच्यासारखे मटका किंग या परिसरात निर्माण झाले. स्थानिक पुढाऱ्याच्या हट्टा पायी लोभापायी चे दोनशे मटका एजंटचं जाळ बारामती एमआयडीसी परिसरात उभं केले गेले. अखंड बारामती एमआयडीसी परप्रांतीयांच्या कामावर मजुरीवर आज चालू आहे. अनेक कारखाने उद्योग बारामती सोडून पर जिल्ह्यात पर राज्यात जात आहेत. अनेक सूतगिरण्या कापड उद्योग बंद पडत आहेत तर राजकीय दलालांच्या घशात हे घातले जात आहेत. एका बाजूने मटक्याचा व्यवसाय होत आहे तर दुसऱ्या बाजूने बारामती एमआयडीसीतील उद्योगधंदे रोजगार संपुष्टात येत आहे. याच बरोबर हप्ते खोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मारामाऱ्या, हत्या, बेकायदा शस्त्र बाळगणे, लुटमारी करणे असे असंख्य गुन्हे बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडत आहे. मटक्याच्या एजंटची रोजची कमाई फक्त कमिशन दहा-दहा हजार रुपये होत आहे तर लाखोच्या घरात रोजचा धंदा चालू आहे. या धंद्यावर डल्ला मारणारे अनेक टोळ्या तयार झाल्या असून अल्पवयीन मुलांचा वापर करून या टोळ्या लाखोंची कमाई करत आहेत व या टोळी युद्धातूनच एक तरुण मुलाचा खून बारामती पोलीस ग्रामीण हद्दीत झालेला आहे. सदर गुन्ह्याचा मास्टरमाईंड आजही मोकाट असून या टोळी युद्धाच्या बिमोडासाठी पोलीस यंत्रणा असमर्थता दर्शवत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे व आर्थिक अव्यवहारामुळे येथे अनेक दोन नंबरचे बेकायदेशीर धंदे चालू आहेत. इथल्या व्यावसायिकाकडून वर्गणीच्या नावावर खंडणी गोळा करणारे इथल्या तरुण पोरांना दारू विक्री एजंट बनवत आहेत, मटका फाडणारे एजंट बनवत आहेत, ताडी तसेच देशी विदेशी दारूचे ठेल्ले अख्या एमआयडीसी परिसरात व एमआयडीसी मध्ये खुलेआम चालू आहेत. अनेक छोट्या-मोठ्या स्नॅक्स सेंटर हॉटेलमध्ये देशी विदेशी दारू विकले जात आहे. तिथले उद्योजक व्यावसायिक या टोळी युद्धाला हप्ते खोरीला व प्रशासनाच्या असहकार्याला कंटाळून बारामती सोडून जात आहेत. विकसित बारामतीचा विकासदर खालावला असून गुन्हेगारी, गुन्ह्यातल्या तडजोडी, आर्थिक अव्यवहार विकसित बारामतीचा खंडर बारामतीमध्ये रूपांतर केल्याशिवाय थांबणार नाही का नाहीत का? बारामती एमआयडीसी परिसरातील गावगाड्यातील गावगाड्यातून मटका, जुगार, दारू, ताडी, हप्तेखोरी टोळी युद्ध व काल-परवा झालेल्या अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार बंद होणार आहेत का?