गाव तेथे शाखा या अभियाना अतंर्गत कोऱ्हाळे बु. येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन


बारामती (कोऱ्हाळे बु.):- वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर युवा प्रदेश अध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशाने तसेच पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार गाव तेथे शाखा हे अभियान वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सुरू आहे. बारामती तालु्यातील कोऱ्हाळे बु. गावा मध्ये दि.15 मार्च 2024 रोजी मोठ्या संख्येने युवकांच्या उपस्थित पार पडला. वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत असताना बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात युवक आघाडी शाखा तयार करून युवकांचे प्रश्न सोडवणार आहे व युवकांना बळ देणार असल्याचे सांगितले तसेच कार्यकर्त्यांनी लोकसभा इलेक्शन साठी तयार राहून जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीला कसे मतदान होईल यासाठी कार्यकर्त्यांनी गावात काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच शाखेचे पदाधिकारी यांनी गावातील लोकांचे प्रश्न सोडून वंचितला घराघरात पोहोचवलं पाहिजे म्हणत कार्यकर्त्यांना कोणत्या अडीअडचणी आल्या तर पक्षामार्फत त्या सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले व शाखेच्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी राजकीय परिस्थती काय आहे आणि वंचित बहुजन आघाडी ला का सत्तेत बसवायला हवे यावे मार्गदर्शन करत नवनियुक्त शाखा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून शाखा कार्यकारणी शुभेच्छा दिल्या त्यावेळी जिल्हा संघटक सुरज कोरडे, बारामती शहर सचिव विनय दामोदर युवा तालुकाध्यक्ष अनुप मोरे उपाध्यक्ष विश्वजीत चव्हाण उपाध्यक्ष सनी सोनवणे, महासचिव डॉ.सुधीर साळवे तसेच बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण वंचित युवा आघाडी कोऱ्हाळे बु. शाखेचे उद्घाटन करून कोऱ्हाळे बु. शाखा युवा अध्यक्ष निखिल चव्हाण, उपाध्यक्ष धोंडीबा टेंगले, उपाध्यक्ष समीर माने, सचिव मंगेश अडागळे, सहसचिव सागर जगताप, अमीर शेख संपर्क प्रमुख भूषण चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख रोहित चव्हाण, संघटक किशोर पानसरे, दीपक चव्हाण, महेश चव्हाण वाहिद शेख, शाहरुख डांगे, शाहरुख पठाण उपस्थित होते कोऱ्हाळे बु. शाखा युवा अध्यक्ष यांना वंचित युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व मंगलदास भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »