सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय बंद का?
बारामती– बारामती येथील प्रशासकीय भवन मधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय व कामकाज काल बंद असल्याचे नागरिक सांगत होते. कार्यालय बंद असल्याने काम घेऊन आलेल्या नागरिकांमध्ये एकच चर्चा होत होती. कार्यलय बंद का? असल्याचे विचारले असता नागरिकांनी असे सांगितले की बारामती येथील गेस्ट हाऊस मध्ये अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांची आखाड पार्टी चालू असल्याचे समजत आहे. या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले आहे व अतिशय जोमान आखाड पार्टी चालू असल्याचे लोकांकडून समजत आहे. यावर अधिकारी व कर्मचारी हे फक्त आणि फक्त पार्टी करण्याच्या उद्देशाने तिथे गेले असल्याचे स्थानिक व नागरिकाकडून समजले जात आहे. वर्ग एक व दोनच्या अधिकारी व वर्ग तीन व चार चे कर्मचारी शुक्रवार दि.26 जुलै 2024 रोजी गायब झाल्याची चर्चा पसरत आहे. अधिकारी जर अशा प्रकारच्या पार्ट्या करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे? त्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का यावर विभागामध्ये काम घेऊन आलेले नागरिक विचारत आहेत.