मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांचा राडा


बारामती – बारामती येथील प्रचलित अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शिकणारे एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांनी जयशंकर गरड या युवकाला बेदम मारहाण केल्याचे समजले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय मधील शिकणारे एमबीबीएस या वर्गातील सुनील महतो व अब्दुल खान व त्यांचे मित्र हे महाविद्यालय विद्यार्थी चहापाण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या महिला हॉस्पिटल समोरील तळ्याच्या इथे गेले असता त्यांची किरकोळ कारणावरून जयशंकर गरड या युवकावर वादावादी झाली. सदरचा वाद हा विद्यार्थ्यांनी खूपच वाढवला व वादाचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले व त्या युवकाला बेदम मारहाण करून गाडीवर बसून त्याला आपल्या होस्टेलवर आणले व त्याला मारहाण केली असे बारामती संचार च्या संपादक मोइन बागवान यांच्याशी बोलताना तेथील कामगार वर्ग सांगत आहे सदरची गंभीर घटना घडत असताना सुरक्षा रक्षक यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना साथ दिली असल्याचे कामगार वर्ग सांगत आहे सुनील महतो व अब्दुल खान यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मेहेर हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »