आंदोलनाचा इशारा देताच बा.न.प खडबडून जागी; मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम सुरू
युवा क्रांती जनकल्याण संघटनेच्या मागणीला यश
बारामती – बारामती शहरात मागील अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. नुकतीच शहरातील समर्थनगर येथील भटक्या कुत्र्यांनी महिलेवर जीवघेणा हल्ला चढवल्याची घटना घडली होती. ही घटना लक्षात घेता युवा क्रांती जनकल्याण संघटनेने 8 दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असा इशारा दिला होता. आंदोलनाचा इशारा देताच बारामती नगरपालिका खडबडून जागी झाली. नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
समर्थनगर भागातील महिलेचे मोकाट कुत्र्यांनी जीव घेणे लचके तोडले होते. यापूर्वीही शहरात असेच प्रकार घडले होते. मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते होती. आणि ती हवेतच विरून जात होती. त्या चर्चेची काहीच फलनिष्पत्ती निघत नव्हती. चर्चेचे गुऱ्हाळ चर्चेतच संपत होते.
शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आला नव्हता. मात्र युवा क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला असता 8 दिवसाच्या आत मध्ये मोकाट कुत्री पकडण्यासाठी ची मोहीम सुरू करण्यात आली. आता नगरपालिकेने मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार काल दिवसभरात तब्बल तेरा कुत्रे पकडल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली. दरम्यान बस स्टँड परिसर, पानगल्ली, सटवाजीनगर, मंडई, इंदापूर रोड, सिनेमा रोड भागातील नागरिकांकडूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
एक दोन महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीवर भटक्या कुत्र्यांनी जीव घेणा हल्ला केला होता, त्यात तिला गंभीर इजा झाली होती. तेव्हा पासून मी बारामती नगरपालिकेला भटक्या कुत्र्यांची तक्रार करत होतो, परंतु कोणी दखल घेतली नाही.
-गणेश भागवत, नागरिकभटक्या कुत्र्यांमुळे गल्लीतील जेष्ठ नागरिक भयभीत झाले होते. मॉर्निंग वॉक साठी निघता येत नव्हते. लहान मुले व शाळकरी मुलांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते.
-गणेश माने, नागरिक