बा. न. प भाड्याचे भाडं!


बारामती – महाकार्यक्षम, कृतिकुशल, नगरपरिषद कायदेपंडित मित्तभाषिक, कर्तव्याला वर्षानुवर्ष चिंगम सारखा चगळून खाऊन पुरवणारा, क्षणाची ही उसंत न घेणारा, तत्पर्यतेने सेवा देणारा क्षणात तक्रार निवारण करणारा, आधुनिक रॉबर्ट बारामती नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषद मालकीचे मालमत्तेचे अभेद संरक्षण शिपाई, नगरपरिषद मालमत्तेला डाग ही न पडू देणारा, नगर परिषदेचे संबंधित करार मोडणाऱ्यांना हुतात्मा चौकात (भिगवन चौकात) हुतात्मा प्राप्त करून देणारा, कायदा प्रेमी कुठल्याही नगरपरिषद भाडेकरू कडून सुपारीचा खांड चहाचा थेंबही न घेणारा, नगरपरिषद मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या वर बुलडोझर चालवणारा आदित्यनाथ, बारामती नगरपरिषद मालमत्ता मुताऱ्यांमध्ये चंदन सुगंध पसरवणारा, एकही विष्टेची घाण न दिसणारा, लघुशंका कोठेही मुतारीत सासत नाही अशी व्यवस्था करणारा सुंदर दृष्ट्या कार्यकुशल कल्पक या कर्मचाऱ्याला आकाशापेक्षाही जास्त कार्य कौशल्याबद्दल शुभेच्छा..!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »