बा.न.प कारवाई: बारामतीत अनधिकृत मोबाईल टॉवर बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल


बारामतीत अनधिकृत मोबाईल टॉवर बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल

बारामती, दि. २८ : बारामती शहरातील तांबेनगर एमआयडीसी परिसरात नगरपरिषदेची आवश्यक परवानगी न घेता मोबाईल टॉवरचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(७) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी संदीप किसन आगवणे (वय ४३), प्रभारी लिपिक व क्षेत्रीय अधिकारी, बारामती नगरपरिषद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजे तांदुळवाडी, वॉर्ड क्रमांक १२, प्लॉट क्रमांक १३२, तांबेनगर एमआयडीसी येथे परवानगीशिवाय मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार नगरपरिषदेकडे प्राप्त झाली होती. चौकशीअंती संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले.

Advertisemen

यानंतर संबंधित बांधकामधारक हर्षद भानुदास कांबळे यांना आवश्यक बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी तसेच अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, नोटिशीचे पालन न करता बांधकाम कायम ठेवल्याने नगररचना विभागाने कायदेशीर कारवाईची शिफारस केली.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०३२७/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर भीमराव काळे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »